Coronavirus E-Sakal
मुंबई

दिलासादायक! मुंबईत रुग्णवाढीचा दर अर्ध्या टक्क्याच्या खाली

रूग्णदुपटीचा कालावधी १७० दिवसांवर; रिकव्हरी रेटही वाढला

मिलिंद तांबे

रूग्णदुपटीचा कालावधी १७० दिवसांवर; रिकव्हरी रेटही वाढला

मुंबई: कोरोना रुग्णवाढीचा सरासरी (Corona Patients) दर कमी होऊन 0.39 टक्क्यांवर खाली आला आहे. रुग्ण दुपटीचा कालावधीही (Doubling Rate) कमी होऊन 170 दिवसांवर आला आहे. त्यामुळे मुंबईत नव्या रुग्णांची (New Cases) संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याचे दिलासादायक चित्र समोर आले आहे. आजही नव्या रुग्णांपेक्षा कोरोनातून बरे (Recovery Rate) झालेल्या रुग्णांची संख्या अधिक असून 1 हजार 717 नवीन रुग्ण सापडले. तर 6 हजार 82 रुग्णांनी कोरोनावर मात केली. यामुळे रुग्णांची वाढती संख्या नियंत्रणात आल्याचे दिसते. मुंबईतील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 6 लाख 79 हजार 986 इतकी झाली आहे. (Mumbai New Corona Cases Rate has come down below half percent)

आतापर्यंत 57,61,689 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92 टक्के आहे. रुग्णसंख्या नियंत्रणात आल्याने सक्रिय रुग्णांचा आकडा कमी होऊन 41,102 हजारांवर आला आहे. मुंबईत आज 6082 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत 6,23,080 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.

मुंबईत आज दिवसभरात 51 रुग्णांचा मृत्यूची नोंद झाल्याने मृतांचा आकडा 13 हजार 942 वर पोहोचला आहे. आज मृत झालेल्यापैकी 21 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृत्यू झालेल्यांमध्ये 35 पुरुष तर 16 महिला रुग्णांचा समावेश होता. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 6 रुग्णांचे वय 40 वयोगटाच्या खालील होते. 20 रुग्णांचे वय 40 ते 60 वयोगटातील होते तर 25 रुग्णांचे वर 60 वर्षाच्या वर होते.

मुंबईत 81 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 479 इतकी आहे. बाधित रूग्णांच्या संपर्कात येणा-या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात 24,898 अति जोखमीचे व्यक्ती आले आहेत. आज कोविड काळजी केंद्र 1 मध्ये अति जोखमीचे संपर्क उपचारासाठी दाखल 914 करण्यात आले.

धारावीत 9 नवे रुग्ण

धारावीतील रुग्णसंख्या नियंत्रणात आली असून धारावीत आज 9 नवीन रुग्ण सापडले असून एकूण रुग्णांची संख्या 6641 वर पोहोचली आहे. दादर मध्ये आज 24 नव्या रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णांची संख्या 9157 झाली आहे. माहीम मध्ये 27 रुग्ण सापडले असून एकूण रुग्ण 9366 इतके रुग्ण झाले आहेत.जी उत्तर मधील रुग्णसंख्या कमी झाली आहे. जी उत्तर मध्ये आज 60 नव्या रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णसंख्या 25,164 झाली आहे.

(संपादन- विराज भागवत)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs UAE Live: बिचारे... PCB ने खेळाडूंना तोंडावर पाडले, बॅगा घेऊन स्टेडियमवर पोहोचले; मॅच रेफरी Andy Pycroft च राहिले, टॉसही हरले

Pune: 'आर्टी'च्यावतीने शनिवारी पुण्यात अभियंता उद्योजक कार्यशाळा

Latest Marathi News Updates: कन्नडच्या एसडीएम कार्यालयासमोर कोळी समाजाचे आमरण उपोषण

Pachod News : गुन्हा दाखल केलेल्या इसमांवर पोलिसांनी कारवाई न केल्याने एकाने व्हिडीओ बनवून केले विष प्राशन; घाटी रुग्णालयात उपचार सुरू

PAK vs UAE Update: पाकिस्तानची लाचारी पुन्हा दिसली... पैशांसाठी आत्मसन्मान ठेवला गहाण; Jay Shah यांनी कान टोचताच खेळायला तयार

SCROLL FOR NEXT