मुंबई : बातमी मुंबईकरांच्या आरोग्यावर थेट परिणाम करणारी. मुंबईत तब्बल ४० खासगी रुग्णालयं धोकादायक स्थितीत असल्याची धक्कादायक माहिती समोर येतेय. नुकतीच मुंबईतील खासगी रुग्णालयांची तपासणी करण्यात आली. यामध्ये मुंबईतील तब्बल ३४२ रुग्णालयांमध्ये विविध स्वरूपाचे धोके आढळून आले आहेत.
भंडाऱ्यातील रुग्णालयात घडलेली आगीची भीषण दुर्घटना ताजी आहे. अशात मुंबईत अग्निशमन दलाने मुंबईतील तब्बल ११ हजार रुग्णालयांची तपासणी केली. या तपासणीमधून धक्कादायक बाब समोर आली आहे.
मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील खासगी रुग्णालयांची फायर ऑडिट करण्याचे अग्निशमन विभागाला आदेश दिले होते. यानंतर मुंबई फायर ब्रिगेडच्या माध्यमातून मुंबईतील तब्बल ११ हजार ४९ खासगी रुग्णालयांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत ११ हजार रुग्णालयांपैकी १२८ रुग्णालये बंद अवस्थेत असल्याचं समोर आलं. तर गंभीर धोके आढळलेल्या रुग्णालयांसह किरकोळ दुरुस्तीची आवश्यकता असणाऱ्या रुग्णालयांची संख्या जवळपास एक हजार इतकी आहे. या रुग्णालयांना देखभालीसाठी मुंबई महानगरपालिकेने नोटीस बजावली आहे.
या महत्त्वाच्या बातम्या देखील वाचा :
mumbai news 342 hospitals in the city are dangerous says audit done by mumbai fire brigade
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.