मुंबई

सोनू सूद बॅकफूटवर ! असं काय घडलं की आता सोनू सूद हॉटेलसाठी घेणार अधिकृत परवानगी

- सुनीता महामुणकर

मुंबई, ता. 5 : अनधिकृत बांधकाम केल्याचा ठपका ठेवलेल्या अभिनेता सोनू सूदने अखेर मुंबई महापालिकेकडे बांधकाम नियमित करण्यासाठी अर्ज करण्याची तयारी दर्शविली आहे. सर्वोच्च न्यायालयात केलेली याचिकाही सोनूने आज मागे घेतली.

जुहू येथील सहा मजली शक्तिसागर निवासी इमारतीचे हॉटेलमध्ये परिवर्तन करताना त्याने महापालिकेची परवानगी घेतली नाही आणि नियमांचे उल्लंघन केले आहे, अशी नोटीस महापालिकेने त्याला बजावली आहे. याविरोधात त्याने दिंडोशी आणि उच्च न्यायालयात याचिका केल्या होत्या. मात्र न्यायालयाने त्याची याचिका नामंजूर केली आहे. त्यामुळे त्याने ज्येष्ठ विधीज्ञ मुकुल रोहतगी यांच्या मार्फत सर्वोच्च न्यायालयात याचिका केली होती. याचिकेवर आज सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या खंडपीठापुढे  व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारा सुनावणी झाली.

न्यायालयाने सोनूला याचिका मागे घेण्याचा सल्ला दिला असून तो महापालिकेकडे बांधकाम नियमित करण्यासाठी अर्ज करणार आहे, त्यामुळे याचिका मागे घेत आहोत असे रोहतगी यांनी खंडपीठाला सांगितले. खंडपीठाने यावर समाधान व्यक्त केले. हा योग्य सल्ला आहे आणि बरोबर देखील आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक जण ही भूमिका घेत नाही, असे मत खंडपीठाने व्यक्त केले. महापालिकेने नियमाप्रमाणे यावर निर्णय घ्यावा असेही खंडपीठाने म्हटले आहे. तसेच निर्णय होईपर्यंत महापालिकेने कठोर कारवाई करु नये असे तोंडी निर्देश दिले.

सोनूने सहा मजली इमारत हॉटेलमध्ये वर्ग केली आहे. त्यासाठी इमारतीचा मूळ आराखडा बदलला आहे. यावर महापालिकेने दोन वर्षांपूर्वी नोटीस बजावली होती. तसेच पाडकामाची कारवाई देखील केली होती. महापालिका आकसाने कारवाई करत आहे, असे सोनूने याचिकेत म्हटले होते. लॉकडाऊनमध्ये या इमारतीत पोलिसांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती, असेही याचिकेत सांगितले आहे.

Actor Sonu Sood has finally shown readiness to apply to BMCfor regularization of construction

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HSRP Number Plate Issue : ‘एचएसआरपी’ नंबर प्लेटमुळे डोक्याला ताप! निकृष्ट दर्जा व कुचकामी फिटिंगमुळे वाहनचालकांना बसतोय आर्थिक भुर्दंड

पोलिसांचीच चोरट्याला मदत! ९० हजारांची पगार असलेल्या सहायक फौजदारानंतर आता ७० हजारांची पगार असलेला पोलिस गाडीचा चालक शिपाई पण निलंबित, वाचा..

MBBS Mahakumbh : भावी डॉक्टरांसाठी ‘एमबीबीएस महाकुंभ’; ‘सकाळ विद्या’ आणि ‘वे टू ॲडमिशन’ यांच्यावतीने दोन ऑगस्टला आयोजन

Khichu Recipe: नाश्त्याला ट्राय करा गुजराती 'खीचू'; पावसाळ्यात मन जिंकेल हा गरमागरम पदार्थ

मोठा निर्णय! सोलापुरातील आयटी पार्कचा मार्ग मोकळा; पाटबंधारे विभागाकडून ‘MIDC’ला १०० एकर मोफत; उद्योजकांना २००० रुपये प्रति स्क्वेअर मीटर दराने जागा

SCROLL FOR NEXT