mumbai police sakal
मुंबई

Mumbai News : मुंबई पोलिसांवर हल्ला करणारा आफ्रिदी अटकेत

पोलिसांवर हल्ला करणाऱ्या आफ्रिदीवर 30 हून अधिक गुन्हे दाखल आहेत.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली, आंबिवली येथील इराणी वस्ती गुन्हेगारांची वस्ती म्हणूनच प्रसिद्ध आहे. येथे कारवाईसाठी येणाऱ्या पोलिसांवर देखील हल्ले करण्यास येथील नागरिक कचरत नाहीत. काही दिवसांपूर्वीच कारवाईसाठी आलेल्या दहिसर पोलिसांवर हल्ला झाल्याची घटना इराणी वस्तीत घडली होती.

पोलिसांवर हल्ला करणाऱ्या आफ्रिदीच्या मागावर खडकपाडा पोलिस होते. तो सातत्याने जागा बदलत पोलिसांना चकवा देत होता. मात्र पोलिसांनी सापळा रचत अटक केली आहे. या कुख्यात इराण्यावर 30 हून अधिक गुन्हे नोंद असून 10 गुन्ह्यांमध्ये तो फरार होता.

ठाणे जिल्ह्यासह मुंबईत जबरी चोरी, वाहन चोरी, सोनसाखळी चोरी, पोलिसांवर हल्ला करणे यांसारखे गुन्हे करत धुमाकूळ घालणाऱ्या अपे दारा जाफरी उर्फ आफ्रिदी (वय 24) याला खडकपाडा पोलिसांनी सापळा रचून इराणी वस्तीतून अटक केली आहे.

कल्याणचे सहायक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे यांनी दिलेल्या माहितीनुसार काहि दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांचे पथक आंबिवली येथील इराणी वस्तीत एका चोरट्याला अटक करण्यास आले होते. यावेळी आफ्रिदी याने पोलिसांना विरोध करत त्यांच्यावर दगडफेक केली होती. खडकपाडा पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तेव्हापासून येथील वरिष्ठ पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शरद झिने यांनी एका पथकाची नेमणूक करत तपास सुरु केला. आफ्रिदी हा सातत्याने जागा बदलून पोलिसांना चकवा देत होता.

अखेर तो इराणी वस्तीतील मंगल नगर येथे रहात असल्याची माहिती पोलिस पथकाला मिळाली. पोलिसांनी तेथे सापळा रचला तो येताच त्याच्यावर झडप घालत पोलिसांनी त्याला अटक केली.

आफ्रिदी हा कुख्यात गुंड असून त्याच्यावर मुंबई, ठाणे, भिवंडी यांसह अनेक पोलिस ठाण्यात 30 च्या आसपास गुन्हे दाखल आहेत. 10 गुन्ह्यांमध्ये तो फरार आरोपी असून पोलिस त्याचा सातत्याने शोध घेत होती. त्याच्याकडून पोलिसांनी एक चोरीची मोटार सायकल व मंगळसुत्र जप्त केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT