मुंबई

कोट्यवधी रुपये खर्चून, तब्बल १७ वर्षांपासून अजूनही 'या' प्रकल्पाचं काम सुरूच; पिढी बदलली काम अपूर्णच

समीर सुर्वे

मुंबई, ता. १९ : नाले रुंदीकरण, उच्च क्षमतेचे पंपिंग स्टेशन या ब्रिमस्ट्रोवॅड प्रकल्पाअंतर्गत महानगर पालिकेने आतापर्यंत तब्बल २ हजार ४३९ कोटी रुपये खर्च केले आहे. मात्र, गेल्या १७ वर्षापासून सुरु असलेले हे काम अद्याप पुर्ण झालेले नाही. तर, या ब्रिमस्टोवॅडचा खर्च १२०० कोटी रुपयांवरून ४ हजार कोटी रुपयांपर्यंत पोहचण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

२६ जुलै २००५ ला मुंबईत उदभवलेल्या पुरपरीस्थीतीनंतर मुंबई महापालिकेने नाले रुंदीकरण, खोलीकरण आणि उच्च क्षमतेचे पंपिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. हे काम दोन टप्प्यात करण्यात येत आहे. यात ५८ कामांचा समावेश असून त्यातील १६ कामे अद्याप पुर्ण झालेली नाहीत. या १६ पैकी १३ कामे प्रगतीपथावर असून तीन कामे प्रस्तावित आहेत. २००८-०७ पासून ही कामे सुरु असून १२ वर्ष उलटून गेल्यानंतरही ब्रिमस्टोवॅड प्रकल्प पुर्ण झालेला नाही. ब्रिमस्ट्रोवॅड प्रकल्पाचा खर्च २००७ मध्ये १२०० कोटी रुपये अंदाजित होता. त्यानंतर २०१४ मध्ये हा खर्च ३५०० पर्यंत पोहचण्याचा अंदाज होता. आता, सुमारे ४ हजार कोटी खर्चाचा अंदाज आहे. हा संपुर्ण प्रकल्प महानगर पालिकेला २०१२ पर्यंत पुर्ण करायचा होता. त्यानंतर २०१४ मुदत महापालिकेने ठरवलेली होती. ‘नाल्यांच्या आड येणारे अतिक्रमण, जमिन हस्तांतरण यामुळे प्रकल्पाचा कालावधी वाढला आहे. त्यामुळे खर्चातही वाढ झाली आहे. तसेच, पुर्वी समाविष्ट नसलेली कामे करण्यात आल्याने हा खर्च वाढल्याचा दावा पालिका प्रशासन करत आहे.

भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेच्या वेळी बिमस्ट्रोवॅडचा मुद्दा उपस्थीत केला होता. त्यावर महानगर पालिकेने ही माहिती स्थायी समितीत सादर केली आहे. महापालिकेने आतापर्यंत पर्यंत २ हजार ४३९ कोटी रुपये खर्च केले आहेत.त्यातील १ हजार कोटी रुपये केंद्र सरकारकडून अनुदान म्हणून मिळाले आहेत अशी माहिती यामध्ये नमुद करण्यात आली आहे.

जमिनीच्या वादात अडकलेले पंपिंग

माहूल येथील माहूल खाडीवर तसेच पश्‍चिम उपनगरातील मोगारा नाला येथे महानगर पालिका ब्रिमस्ट्रोवॅड अंतर्गत उच्च क्षमतेचे पंपिंग स्टेशन उभारणार आहे. मात्र, माहूल येथील प्रस्तावित जागा ही खारजमिन आयुक्तालयाची असून ती हस्तांतरीत करण्यासाठी महापालिका तसेच राज्य सरकारने पत्रव्यवहार केला आहे. मात्र, केंद्राकडून प्रतिसाद मिळाला नाही. तर, मोगारा नाला येथील भुखंड वादात असल्याने अडचण झाली आहे. हा भुखंड ताब्यात घेण्यासाठी महानगर पालिकेकडून विशेष अधिकार वापरले जाण्याची शक्यता आहे. आतापर्यंत सहा पंपिंग स्टेशन उभारण्यात आले असून त्यासाठी सुमारे ७०० कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. माहुल आणि मोगारा पंपिंगसाठी लवकरच निवीदा काढण्यात येणार आहेत. 

१९८५ मध्ये मुंबईत मोठी पूरपरिस्थिती ओढावली होती. त्यावेळी नाल्याची क्षमता वाढविण्यासाठी प्रकल्प आखण्यात आला होता. बृन्हमुंबई स्टॉर्म वॉटर ड्रेन असे या प्रकल्पाचे नावहोते . त्यावेळी या प्रकल्पाची किंमत १०० कोटीच्या आत होती.

केंद्राकडून २०० कोटीची प्रतिक्षा

केंद्र सरकारने या प्रकल्पासाठी १२०० कोटी रुपयांचे अनुदान देण्याचे आश्‍वासन गेल्या दशकात दिले होते.मात्र,त्यातील १ हजार कोटी रुपयेच पालिकेला मिळालेले आहेत.

mumbai news Brihanmumbai Storm Water Disposal System project uncompleted since last 17 years

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT