मुंबई

स्फोटकांनी सापडलेल्या स्कॉर्पियोचा फॉरेन्सिक अहवाल समोर, आली धक्कादायक माहिती समोर

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके सापडल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. ज्या स्कॉर्पियो गाडीमध्ये जिलेटीनच्या कांड्या आढळून आल्या होत्या त्या गाडीचे फॉरेन्सिक रिपोर्ट आता माध्यमांसमोर आले आहेत. काही मराठी माध्यमांवर याबाबतच्या बातम्या प्रसारित करण्यात आल्या. सापडलेल्या स्कॉर्पियो गाडीचा चेसी आणि इंजिन नंबर कसे मिटवले गेलेत हे महत्त्वाचे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या संशयित गाडीबाबतचा सायबर अहवाल आणि फॉरेन्सिक अहवाल आता समोर येतोय.  

२५ फेब्रुवारी रोजी मुकेश अंबानी यांची निवासाची इमारत अँटिलीया बाहेर स्कॉर्पियो गाडी पार्क झालेली होती. या गाडीमध्ये स्फोटके आढळल्यानंतर क्राईम ब्रांचने गाडीला जप्त करून ताब्यात घेऊन त्याचं फॉरेन्सिक ऑटिड केलेलं. येलो गेट पोलिस स्टेशन मागील जागेत या गाडीचं फॉरेन्सिक ऑडिट केलेलं होतं. हे अहवाल आता टीव्ही माध्यमांमधून समोर येताना पाहायला मिळतायत. या अहवालातून जी माहिती समोर येतेय ती अत्यंत महत्त्वाची आहे. 

या गाडीमध्ये कोणत्याही प्रकारची तोडफोड किंवा बदल करण्यात आलेले नाहीत. १७ फेब्रुवारीला मनसुख हिरेन यांची कार विक्रोळी येथून गायब झाल्यानंतर ज्यांनी ही कार पळवली, त्यांनी यामध्ये कोणत्याही प्रकारची तोडफोड किंवा बदल केले नाहीत अशी माहिती काही माध्यमांच्या रिपोर्टमधून समोर येतेय. या गाडीवर कोणताही फोर्स वापरून दरवाजा उघडला गेलेला नाही असंही यामधून समोर आलं आहे.  

यामधील दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे जैश उल हिंद संघटनेने या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारली होती. त्यांच्यामार्फत जो टेलिग्राम मेसेज पाठवण्यात आला होता तो तिहार जेलमधून पाठवला होता असं देखील सामोर येतेय. पोलिसांकडून याबाबत एक थर्ड पार्टी सायबर इन्व्हेस्टीगेशन केलं आहे. यामध्ये ज्या नंबरवरून बिटकॉइनची मागणी केली गेली ते नंबर Air Tel कंपनीचे असल्याचं आढळून आलं ज्याचं लोकेशन तिहार जेल जवळ होतं. त्यानंतर दिल्ली पोलिसांमार्फत तिहार जेलमध्ये सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं ज्यामध्ये तिहार जेलमधून तीन मोबाईल हस्तगत करण्यात आले. हे मोबाईल जैश ए मोहम्मद, इसिस किंवा ISI चे दहशदवादी ज्या सेलमध्ये ठेवलेत तिथून हस्तगत केल्याचं टीव्ही रिपोर्टमधून समोर येतेय.

आता याप्रकरणी तपास यंत्रणांकडून अधिकृत माहिती कधी समोर येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

mumbai news forensic report of Scorpio car found with gelatin sticks revealed in media

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT