मुंबई

भोंगळपणाला झाली सुरवात; लसीकरण नोंदीसाठी लाभार्थ्यांनी दिलेला नंबर चुकीचा

भाग्यश्री भुवड

मुंबई, 09 : लसीकरण नोंदीसाठी लाभार्थींनी दिलेला नंबर चुकीचा असल्याचे समोर आले आहे. लाभार्थ्यांना संपर्क करण्यासाठी नोंदणी वेळी दिलेले नंबर चुकीचे, संपर्कात नाही, कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर लागणे अशा अडचणी येत आहेत. हे प्रमाण 10 ते 15 टक्के असल्याची माहिती एका पालिका अधिकाऱ्यानी दिली असून प्रत्येक वेळी फोन कनेक्टिव्हिटीची अडचण सांगितली जात आहे. लसीकरणाच्या सुरुवातीला ही फोन कनेक्विव्हिटी याच मोठ्या अडचणीमुळे कित्येक लाभार्थी लसीकरण केंद्रापर्यंत पोहोचत नाही आहेत.  

कोविड लसीकरणासाठी हेल्थकेअर कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी संपर्कात अडथळे येत आहेत. यातून 60 ते 70 टक्के हेल्थकेअर कर्मचारी लसीकरण केंद्रावर अनुपस्थित राहत आहेत. लाभार्थ्यांनी दिलेले नंबरही चुकीचे असल्याचे येत आहेत.  

दरम्यान, केंद्रीकृत को-विन ऍप योग्य प्रकारे कार्यरत नसल्याने सर्व लाभार्थ्यांना व्यक्तिशः माहिती देण्यात आली आहे. यावरून हे लक्षात आले आहे की लक्षित नोंदणीकृत आरोग्यसेवा कामगारांपैकी (हेल्थकेअर वर्कर्स) सुमारे 60 ते 70 टक्के लसीकरण केंद्रांकडे पोहचत नाहीत कारण त्यांना नोंदणीच्या वेळी देण्यात आलेल्या चुकीच्या मोबाइल नंबरमुळे त्यांना मेसेज पोहचत नाहीत आहेत. 

वरिष्ठ आरोग्य अधिकारी म्हणाले की, ते दररोज प्रत्येक केंद्रावर 500 लाभार्थींना लसीकरण करण्याची योजना आखतात. पण, जेव्हा ते कॉल करतात किंवा त्यांना माहिती देऊ इच्छित असतात तेव्हा त्यांचे फोन बंद असल्याचे आढळते, किंवा ते फोन उचलत नाहीत. काही नोंदणीकृत हेल्थकेअर वर्कर्स अजूनही लस घेण्यास अजिबात संकोच करतात, ज्यामुळे ते संपर्कासाठीचे नंबर चुकीचे देतात. जेणेकरून कोणीही त्यांच्यापर्यंत पोहोचू नये. 

शिवाय, राज्य सरकारने सर्व केंद्रांवर वाॅक इन जाण्याची परवानगी दिल्याने लाभार्थ्यांची संख्या वाढली आहे. शहरात आतापर्यंत लक्ष्य केलेल्या 1.10 लाख हेल्थकेअर वर्कर्सपैकी सुमारे 73 टक्के लसीकरण करण्यात आले आहे. 

"पहिल्या सत्रादरम्यान मिळालेला प्रतिसाद आताच्या  तुलनेत चांगला नव्हता. ज्या लाभार्थ्यांनी चुकीचे नंबर दिले आहेत किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत त्यांच्याशी लस घेण्यास इच्छुक असलेल्या लाभार्थ्यांची यादी तयार करण्यासाठी संबंधित रुग्णालयांचे प्रभारी नोडल अधिकार्यांमार्फत पुन्हा संपर्क साधला जाईल", असे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. 

पालिका लसीकरण अधिकारी डॉ. शीला जगताप यांनी सांगितले की, "पहिल्या टप्प्यात लसीकरणाची संधी गमावलेल्या सर्व लाभार्थ्यांना त्यांच्या लसीचा डोस घेण्याची आणखी एक संधी मिळेल. कोविन अ‍ॅपमधील  तांत्रिक गोंधळामुळे हेल्थकेअर वर्कर्सना मेसेज पाठवताना समस्या येत होती, जी अजूनही कायम आहे. दरम्यान, आम्ही नोंदणीकृत लाभार्थ्यांशी व्यक्तिशः आणि को-विनच्या माध्यमातून संपर्क साधत आहोत."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT