मुंबई

भर पंखांतून स्वप्न उद्याचे ! विद्यार्थ्यांनी बनवलेले तब्बल 100 उपग्रह झेपावणार अवकाशात

मिलिंद तांबे

मुंबई : नवी मुंबई येथील डी.ए.व्ही. पब्लिक स्कूलमधील देवांशी विठ्ठल फणसेकर आणि उल्हासनगर येथील सेंट पॉल कनिष्ठ आणि पदवी महाविद्यालयातील साहील सुधीर वराडकर ‘स्पेस रिसर्च पेलोड क्यूब चॅलेंज 2021’( Space Research Palode Cube Challenge ) मध्ये सहभागी होऊन इतर विद्यार्थ्यांसोबत 100 उपग्रह तयार करणार असून हे उपग्रह 7 फेब्रुवारी 2021 रोजी आकाशात भरारी घेणार आहेत.

डॉक्टर APJ Abdul Kalam इंटरनॅशनल फाऊंडेशन व स्पेस रिसर्च इंडियातर्फे ‘स्पेस रिसर्च पेलोड क्यूब चॅलेंज 2021’ चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये कुमारी देवांशी ही इयत्ता पाचवीतील विद्यार्थिनी तर कुमार साहील हा इयत्ता 12 वीत शिकणारा विद्यार्थी आहे.  देशभरातील विविध विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होतील. 10 विद्यार्थी मिळून एक उपग्रह बनविण्यात येत आहे. राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील विविध विद्यार्थ्यांची त्यासाठी निवड करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन प्रशिक्षणदेखील घेण्यात आले आहे. त्यांनी पुणे येथील केंद्रावर 19 जानेवारी 2021 रोजी उपग्रह बनविला आहे. विद्यार्थ्यांनी तयार केलेले सगळे उपग्रह 7 फेब्रुवारी 2021 रोजी रामेश्वरम येथून प्रक्षेपित केले जाणार आहेत.    

भारतात प्रथमच अशा प्रकारचा उपक्रम राबविण्यात येत आहे. जगातील सर्वात कमी वजनाचे हे उपग्रह 35 हजार ते 38 हजार मीटर ऊंचीवर प्रस्तापित केले जातील. हाय अल्टिट्यूड सायंटिफिक बलूनद्वारे ते प्रक्षेपित केले जातील. या उपक्रमाची ‘गिनीज बूक ऑफ वल्ड रेकॉर्ड’, ‘आशिया विक्रम’ आणि ‘इंडिया विक्रमा’त नोंद होणार आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये अवकाश संशोधनाची आवड निर्माण होण्यास मदत होईल.

भविष्यात करिअरच्याही संधी उपलब्ध होऊ शकतील. हा आमच्यासाठी अतिशय आनंदाचा आणि गौरवाचा क्षण आहे, अशी प्रतिक्रिया देवांशी आणि साहीलच्या पालकांनी व्यक्त केली आहे. 

mumbai news updates satellites made by school kids devanshi and sudhir to be launched on 7th feb

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पाण्यात अडकलेल्या तरुणाची रेस्क्यू टीमने केली सुटका

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT