मुंबई

शिवसेना घेणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट, भेटीचं कारण आहे अत्यंत महत्त्वाचं

मिलिंद तांबे

मुंबई : चिघळलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नी चर्चा करण्यासाठी शिवसेना लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ घेणार आहे. शरद पवारांच्या मदतीने लवकरच मोदींची भेट घेणार असल्याचे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले.

कर्नाटकच्या उपमुख्यामंत्र्यांनी मुंबई आमचीच असल्याचे विधान केलं होतं. या विधानानंतर मोठा वादंग निर्माण झाला आहे. यावरून शिवसेना आणि शिवसेनेचे खासदार चांगलेच आक्रमक झाले आहेत. दिल्लीत सुरू असलेले अधिवेशन संपल्यानंतर 1 फेब्रुवारीला  शिवसेनेचे खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट मागणार आहेत. यासाठी शिवसेनेचे खासदार शरद पवार यांना देखील भेटणार असल्याचे खासदार राऊत यांनी सांगितले.

शिवसेनेचे सर्व खासदार शरद पवार यांची भेट घेणार आहेत. मोदींना भेटण्यासाठी शरद पवार यांनी देखील मध्यस्ती करावी यासाठी शिवसेनेचे खासदार प्रयत्न करणार आहेत. मोदी यांनी वेळ दिली तर शरद पवार यांच्या सोबत देखील चर्चा करण्यात येणार आहे, असे ही खासदार राऊत यांनी सांगितले.

mumbai news updates shivsena leaders to meet PM narendra karnataka maharashtra border issue

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Nandani : अखेर माधुरी हत्तीण दोन दिवसात कोल्हापुरात येणार! वनतारातून नांदणीकडे प्रस्थान; राजू शेट्टीनी सोशल मीडियावर दिली माहिती

India T20I Squad : हर्षित राणाला नवी दुखापत, अफगाणिस्तान मालिका अन् Asian Games ला मुकणार! विदर्भाच्या खेळाडूला टीम इंडियात संधी

मुंबई गोवा हायवेच्या उद्घाटनाला येणार नाही, लाज वाटते; गडकरींचे विधान, म्हणाले, आता वेगळा वर्ल्ड रेकॉर्ड करायचाय

Maratha Reservation: मनाेज जरांगेंना ज्योती मेटेंचा थेट सवाल; ‘१२ मागण्या मान्य झाल्या, मग मुंबईला जाण्याचा हट्ट कशासाठी?’

Marathi News Live Updates : जरांगेंच्या समर्थनार्थ मराठा तरुणांचा आक्रमक एल्गार, पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन

SCROLL FOR NEXT