Water
Water  
मुंबई

Mumbai News : मुंबईकरांना पाण्याच्या पाण्याचे टेन्शन वाढले! जलसाठ्यांनी गाठला तळ

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - मुंबई शहराला पाणी पुरवठा करणा-या तलावातील जलसाठ्याने तळ गाठला आहे. त्यातच हवामान खात्याने कमी पाऊस होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. मुंबईतील सात धरणांमध्ये १२.७६ टक्के जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे मुंबईकरांना पिण्याच्या पाण्याचे टेन्शन निर्माण झाले आहे.

जून महिना सुरू झाला आहे. मुंबईला पाणी पुरविण्या-या वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सात धरणांमधून होतो. या सात धरणांनी तळ गाठला असून सातही धरणांमध्ये १२.७६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. हा जलसाठा २५ दिवस पुरेल इतका असल्याची माहिती पालिकेच्या जलअभियंता विभागाने दिली.

आपत्कालिन परिस्थितीत राज्य सरकार राखीव साठ्याच्या वापरास परवानगी दिली जाते. परंतु राखीन जलसाठ्याला राज्य सरकारने अद्याप परवानगी दिलेली नाही. भातसा आणि उर्ध्व वैतरणा या धरणातील राखीव जलसाठा वापरण्याची परनगी मिळावी यासाठी पत्र पाठविण्यात आले असल्याची माहिती पालिकेच्या जलभियंता विभागाने दिली.

जून महिना सुरू झाला असून कडाक्याच्या उन्हाने अंग भाजून निघत आहे. मात्र पावसाचा मागमूसही नाही. त्यामुळे चिंता वाढली आहे. पाऊस कधी पडेल त्याचा भरोसा नाही. त्यामुळे पालिका प्रशासनाचेही टेन्शन वाढले आहे. त्यामुळे प्रशासनाच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

धरणांनी गाठला तळ

मोडक सागर : २८.८३ टक्के

तानसा : २५.०६ टक्के

मध्य वैतरणा : १०.६७ टक्के

भातसा : ११.१९ टक्के

विहार : २७.९० टक्के

तुळशी : ३२.१८ टक्के

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel-Hamas War: पुण्याचे निवृत्त कर्नल गाझामधील हल्ल्यात ठार; दोन महिन्यांपासून UN सोबत करत होते काम

SEBI KYC: कोट्यवधी गुंतवणूकदारांना दिलासा; सेबीने KYC संबंधित नियम केले शिथिल, कोणाला होणार फायदा?

Latest Marathi News Live Update : आज नाशिकमध्ये नरेंद्र मोदी, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या जाहीर सभा

Ghatkopar Hoarding Collapse : सरकार, महापालिकेवर गुन्हा दाखल करा;नाना पटोले, मुंबईतील होर्डिंगमाफियांना संरक्षण

Rishabh Pant : 'जर मी शेवटच्या सामन्यात खेळलो असतो तर...' लखनौवरील विजयानंतर ऋषभ पंतचं प्लेऑफबाबत मोठं वक्तव्य

SCROLL FOR NEXT