मुंबई

शेतकऱ्यांनो सावधान, राज्यात वादळी अवकाळी पावसाची शक्यता; जाणून घ्या महत्त्वाच्या तारखा

मिलिंद तांबे

मुंबई, ता. 15 : मुंबई आणि कोकण परिसर वगळता राज्यातील इतर भागात पुढील तीन दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तर राज्यातील काही भागात पुढील 48 तासात अवकाळी पाऊस कोसळण्याचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केला आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे.

मुंबई तसेच कोकण भागात फारसा बदल जाणवणार नाही. मात्र पुणे शहरात 16 फेब्रुवारीपासून आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. थंडीचा जोरही कमी होण्याची शक्यता आहे. किमान तापमानात वाढ होऊन 14 अंश सेल्सियस वरून ते 16 अंश सेल्सियस पर्यंत वाढण्याची शक्यताही हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. 

सध्याच्या वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होण्याची शक्यता आहे.  18 फेब्रुवारी रोजी आकाश सामन्यत: ढगाळ राहून हलक्या स्वरुपाचा पाऊस पडू शकतो. हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार 16 ते 18 फेब्रुवारी या दोन दिवसांमध्ये राज्यातील विविध भागांमध्ये दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होऊ शकतो असा अंदाज वर्तवला आहे.

पूर्व-विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ, वर्धा आणि अमरावती जिल्ह्यातील पूर्व भागांत 16 फेब्रुवारीला वादळी पावसाचा अंदाज आहे. तर 17 तारखेला विदर्भासह, मराठवाड्यातील बऱ्याच जिल्ह्यांत वादळी पावसाचा अंदाज आहे.

मध्य महाराष्ट्रातील खान्देश, नाशिक, नगर आणि पुणे जिल्ह्यांत 18 फेब्रुवारीला वादळी पावसाचा अंदाज आहे. तर या दरम्यान काही प्रमाणात गारपिटीची शक्यता ही वर्तवण्यात आली आहे. दुसऱ्या दिवशी 19 तारखेला काही प्रमाणात आभाळी हवामान राहील. यानंतर मात्र हवामान हळूहळू पूर्वपदावर येऊन त्यात स्थिरता यायला सुरुवात होईल आणि 20 तारखेपासून राज्यातील हवामान पूर्णपणे स्थिर होईल असा अंदाज देखील व्यक्त करण्यात आला आहे.

mumbai news weather department forecasted unseasonal rain across maharashtra

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Overhead Cable : ओव्हरहेड केबल धोरणाला स्थायीची मान्यता; अनधिकृत केबल वर्षभरासाठी होणार नियमित

'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग खरंच येणार? मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा की मिश्किल टिपण्णी? कैलास पाटलांबद्दल काय म्हणाले?

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT