Fire News sakal
मुंबई

Mumbai: आगीसंदर्भात कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही; न्यायालयाची राज्य सरकारला ताकीद

सकाळ डिजिटल टीम

Fire: मुंबईत सध्या दररोज कुठे ना कुठे आग लागत आहे, आगीच्या घटना वाढत असून त्यात नागरिकांचा जीव जाणे गंभीर बाब आहे, अशी नाराजी आज मुंबई उच्च न्यायालयाने व्‍यक्त केली. न्यायालयाने अग्निशमनच्या सुरक्षा नियमांच्या अंमलबजावणीवरून राज्य सरकारवर ताशेरे ओढले.

सरन्यायाधीश डी. के. उपाध्याय आणि न्या. आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर आगीच्या घटनांसंदर्भात दाखल याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली. मुंबईत आगीच्या घटनांत वाढ होताना दिसत असून नागरिकांना जीव गमवावा लागत आहे. याबाबत कोणताही हलगर्जीपणा स्वीकारता येणार नाही, असे खडे बोल उच्च न्यायालयाने सुनावले. राज्य सरकारला कोणती पावले उचलण्याची गरज आहे, हे सांगणे न्यायालयाचे काम नसून या समस्येची गंभीर दखल घेण्याचा सल्ला उच्च न्यायालयाने दिला.

अतिरिक्त सरकारी वकील ज्योती चव्हाण यांनी न्यायालयात राज्य सरकारच्या वतीने युक्तिवाद केला. गेल्या वर्षी स्थापन करण्यात आलेल्या तज्ज्ञ समितीने फेब्रुवारी २०२३ मध्ये आपला अहवाल सादर केला होता. हा अहवाल राज्याच्या नगरविकास विभागासमोर विचारार्थ असून २०३४ च्या विकास आराखड्यात सुधारणा करताना पावले उचलण्यात येणार असल्याचे राज्य सरकारने न्यायालयात सांगितले.

न्यायालयाने त्यावर हा अहवाल फेब्रुवारीमध्ये सादर करण्यात आला होता आणि आजतागायत कोणतीही पावले उचलली गेली नाहीत, सरकार काय करत आहे, असा प्रश्न उपस्थित करत, कोणताही हलगर्जीपणा स्वीकारता येणार नाही, अशी सक्त ताकीद राज्य सरकारला दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

SCROLL FOR NEXT