omicron sakal media
मुंबई

मुंबईत ओमिक्रॉनचे 46 टक्के रुग्ण; BMC चा चाचण्यांवर भर

मिलिंद तांबे

मुंबई : मुंबईत ओमिक्रॉन विषाणू (Omicron variant) बाधित रुग्णांची संध्या वाढत आहे. राज्यात आतापर्यंत सापडलेल्या एकूण रुग्णांपैकी सर्वाधिक 46 टक्के रुग्ण मुंबईत (omicron patients in Mumbai) सापडले आहेत. ओमिक्रॉन संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने (BMC) जिनोम सिक्वेन्सींग चाचण्यांवर (Genome sequencing) भर दिला आहे.

राज्यात आतापर्यंत 65 ओमिक्रॉन बाधित रुग्ण सापडले आहेत. त्यातील सर्वाधिक 30 रुग्ण मुंबईतील आहेत. त्यातील 85 टक्के लोकांना ब्रेक थ्रू संसर्ग म्हणजे कोरोना लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्यानंतर ही संसर्ग झाला आहे. मात्र फार कमी लोकांना सौम्य लक्षणे असून इतर सर्व रुग्ण लक्षणे विरहित आहेत.

मुंबई विमानतळावर आतापर्यंत 8626 प्रवासी दाखल झाले आहेत. त्यातील 72 प्रवासी आणि सहवासितांना कोविडची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तर आतापर्यंत 30 प्रवाश्यांचा ओमायक्रॉन नमुना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यापैकी 13 जणांना बरे झाल्यानंतर घरी सोडून देण्यात आले आहे.

जिल्हा /मनपा बाधित रुग्ण

मुंबई 30

पिंपरी चिंचवड 12

पुणे ग्रामीण 7

पुणे मनपा 3

सातारा 3

कल्याण डोंबिवली 2

उस्मानाबाद 3

बुलडाणा 1

नागपूर 1

लातूर 1

वसई विरार 1

नवी मुंबई 1

एकूण 65

"ओमिक्रॉनसह कोरोना संसर्ग नियंत्रणात आहे. महापालिका प्रशासन योग्य ती खबरदारी घेत आहे. बाधित रुग्णांपैकी बरेच रुग्ण बाहेरच्या राज्यातील देखील आहेत."

-सुरेश काकाणी , अतिरिक्त आयुक्त , मुंबई महानगरपालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News : मध्यरात्री भीषण अपघात ! कार ५०० मीटर खोल दरीत कोसळली, ८ जणांचा मृत्यू

Ramdas Athawale : ‘उत्तम, नुसती नावे सांगू नकोस' मंत्री रामदास आठवलेंनी कोल्हापूरच्या जिल्ह्यातील नेत्यांची केली खरडपट्टी

असं काय घडलं की, नाटक सुरु असताना स्वप्नील जोशीचं मध्येच थांबवलं, म्हणाला...'सॉरी पण...'

CJI Suryakant: ‘तारीख पे तारीख’ युग संपलं? सुप्रीम कोर्टाची हायकोर्टांसाठी नवी डेडलाइन, न्यायासाठी वर्षानुवर्षे वाट पाहावी लागणार नाही

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, थांबलेल्या ट्रकला कारची धडक; माय-लेकीचा मृत्यू, बाप-लेक गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT