Corona Fight
Corona Fight sakal media
मुंबई

मुंबईत कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी फक्त 1 टक्के रुग्ण गंभीर

भाग्यश्री भुवड

मुंबई : मुंबईत कोरोना नियंत्रणात (corona) येत असून सक्रिय रुग्णांची (active corona patients) संख्या कमी झाली आहे. त्यातही मुंबईसाठी ( Mumbai) दिलासादायी बाब म्हणजे एकूण रुग्णांपैकी फक्त 1 टक्केच (one percent patient) रुग्ण गंभीर आहेत. तर, एकूण सक्रिय रुग्णांपैकी 10 टक्के रुग्ण गंभीर आहेत. मुंबईत दररोज कोविड 19 (Corona cases) ची प्रकरणे 500 च्या खाली गेल्यामुळे शहरातील गंभीर रूग्णांची संख्याही खाली आली आहे. गुरुवारपर्यंत 5,267 सक्रिय प्रकरणांपैकी 534 म्हणजेच जवळपास 10% रुग्णांची गंभीर परिस्थिती सध्या पालिकेच्या (BMC) आकडेवारीनुसार आहे. तर, सक्रिय रुग्णांपैकी 42 टक्के रुग्ण लक्षण नसलेले आहेत. ( Mumbai on corona free situation only one percent patient serious says bmc-nss91)

1 जुलै रोजी मुंबईत गंभीर रूग्णांची संख्या एकूण 761 एवढी होती. तर, 8,498 सक्रिय रुग्ण होते. तर त्याचे प्रमाण 9 टक्क्यांपर्यंत होते. त्यानंतर सोमवारपर्यंत गंभीर रूग्णांच्या संख्येत 27 टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, यापैकी बरेच रुग्ण लक्षणे गंभीर झाल्यानंतर उशिरा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल होतात. सेव्हन हिल्स रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. बाळकृष्ण अडसूळ यांनी सांगितले की, बरेच जण घरी उपचार करतात. काही जण खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेतात आणि प्रकृती गंभीर झाली की पालिका रुग्णालयात दाखल होतात. यातून बराचसा वेळ निघून गेलेला असतो. पण, आता गंभीर रुग्णांची संख्या कमी आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत आयसीयूमधील रुग्णांच्या रिकव्हरीचे प्रमाण ही वाढले आहे. 300 बेडपैकी फक्त 180 गंभीर रुग्ण आहेत असेही डॉ. अडसूळ म्हणाले.

खासगी रुग्णालयातही गंभीर रुग्णांची संख्या घटली

दरम्यान, खासगी रुग्णालयातील कोरोना रुग्णसंख्या आणि त्यापैकी गंभीर रुग्णांची संख्या कमी झाली आहे. वांद्रे येथील लिलावती रुग्णालयात गुरुवारपर्यंत फक्त 9 रुग्ण आयसीयूत दाखल होते. त्यापैकी ही फक्त 2 ते 3 रुग्णांची प्रकृती गंभीर होती. इतर रुग्णांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे असे लीलावती रुग्णालयातील कार्यरत डॉक्टर डॉ. जलील पारकर यांनी सांगितले.

लसीकरणातून परिस्थिती नियंत्रणात

व्हायरसचा कमी झालेला संसर्ग, लसीकरण आणि योग्य व वेळेवर उपचार शिवाय, मोनोक्लोनल अँन्टीबॉडी कॉकटेलसारख्या पर्यायांमुळे  रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण तसेच गंभीर रूग्णांची संख्या कमी झाली आहे. जवळपास 80 टक्के कोविड बेड्स आता रिक्त असून नॉन कोविड रुग्णांवर ही उपचार केले जात आहेत असेही डॉ. पारकर यांनी स्पष्ट केले आहे.

मुंबईतील एकूण परिस्थिती

सक्रिय रुग्ण   5,267  

लक्षणे नसलेले रुग्ण 2219

गंभीर रुग्ण          534  

लक्षणे असलेले रुग्ण 2514

बरे झालेले रुग्ण 7,11,315

एकूण रुग्ण 7,34,761

14 टक्के बेड्स भरलेले

पालिकेच्या डॅशबोर्डनुसार मुंबईत एकूण 21,315 कोविड बेड्स आहेत. ज्यात डीसीएच, डीसीएचसी आणि सीसीसी 2 अशा कोविड केंद्रांचा समावेश आहे. त्यातील 2852 म्हणजेच फक्त 14 टक्के बेड्स भरलेले आहेत. तर, आयसीयूच्या 2,283 बेड्सपैकी 1,456 बेड्स रिक्त आहेत. 16 जुलैपासून मुंबईत दररोज 500 पेक्षा कमी रुग्णसंख्या नोंदली जात आहे. म्हणजेच मुंबई शहराची स्थिती सध्या चांगली आहे. पण, आम्ही सर्व सुविधा कायम ठेवणार आहोत. जास्तीत जास्त लसीकरण आणि संभाव्य तिसऱ्या लाटेची तयारी पालिकेकडून केली जात आहे असे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

DY Chandrachud: CJI चंद्रचूड मुलांमधील सायबर गुन्ह्यांबद्दल चिंतित, आंतरराष्ट्रीय सहकार्याचे केले आवाहन

Brittany Lauga: ड्रग्जच्या नशेत ऑस्ट्रेलियन महिला खासदाराचे लैंगिक शोषण, इंस्टाग्राम पोस्टद्वारे व्यक्त केल्या वेदना

ICC ची मोठी घोषणा! महिला T20 World Cup 2024 चे शेड्यूल जाहीर; जाणून घ्या कधी भिडणार भारत-पाकिस्तान

SCROLL FOR NEXT