PM Narendra Modi sakal
मुंबई

Mumbai Police Alert : PM मोदींच्या दौऱ्यापूर्वी मुंबई पोलीस सतर्क; 'या' गोष्टींवर असणार बंदी

मुंबई दौऱ्यात पंतप्रधान मोदी छत्रपती शिवाजी टर्मिनल येथे दोन वंदे भारत ट्रेनचे उद्घाटन करणार आहेत.

सकाळ डिजिटल टीम

PM Modi Mumbai Visit : येत्या १० फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. त्याआधी मुंबई पोलिसांनी अलर्ट जारी केला आहे.

हेही वाचा : ढोलेरा- ग्रीनफिल्ड सिटी आणि महाप्रचंड औद्योगिक हब...

जारी करण्यात आलेल्या अलर्टमध्ये मुंबई पोलिसांनी मरोळ, अंधेरी, कुलाबा, सीएसटी येथे पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या ठिकाणी ड्रोन आणि इतर गोष्टींवर बंदी घातली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 फेब्रुवारीला मुंबई दौऱ्यावर येणार असून, यादरम्यान ते छत्रपती शिवाजी टर्मिनल येथे पंतप्रधान वंदे भारत ट्रेनचे उद्घाटन करणार आहेत.

दरम्यान, या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी कलम 144 अंतर्गत अलर्ट जारी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात सुरक्षा व्यवस्थेत कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी मुंबई पोलीस केंद्रीय यंत्रणांसोबत काम करत आहेत.

मुंबईहून लवकरच दोन नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्या सुरू होणार असून, एक वंदे भारत ट्रेन मुंबई-सोलापूर मार्गावर तर, दुसरी मुंबई-शिर्डी मार्रगावर धावणार आहे. त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी १० फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून दोन्ही वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. या दोन्ही गाड्या चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये तयार करण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: आई कुठे आहे बाबा? वडिलांचं उत्तर ऐकून मुलं सुन्न झाली… "मी तुमच्या आईला मारले, तिला पुरून टाका"

Sunil Bagul : व्हिडिओ हटविण्याच्या वादातून घरात घुसून मारहाण; बागूल यांची अटकपूर्व सुनावणी पुढे ढकलली

Latest Maharashtra News Updates : २ तासांच्या तणावानंतर अखेर मोर्चाला परवानगी; ठरलेल्या मार्गावरूनच निघाला मोर्चा

Nashik Citylink Bus : नाशिक सिटीलिंक बससेवेला ४ वर्षे पूर्ण; ८ कोटींहून अधिक प्रवासी, २४३ कोटींचा महसूल

Shravan Month 2025 Festivals List: श्रावण महिना- सणांचा थाट, आनंदाचा बहर, जाणून घ्या महत्त्व अन् श्रावण महिन्यात येणारे सण

SCROLL FOR NEXT