रोहिणी गोसावी : सकाळ वृत्तसेवा
मुंबई : मुंबईतून एक कोटीपेक्षा जास्त किमतीचे चांदिचे दागिने चोरणाऱ्या (Silver ornaments robbery) चोराला व्ही पी मार्ग पोलिसांनी कानपुरमधून (thief arrested from kanpur) अटक केली आहे. त्याच्याकडून काही मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. मुंबईतील सुरेंद्र आचार्य (55) यांनी यशवंत आचार्य याला 254 किलो वजनाचे चांदिचे दागिने ज्याची किंमत साधाराणपणे 1 कोटी 77 लाख 85 हजार इतकी आहे, ते विक्री करण्यासाठी दिले होते. त्याच्यासोबतच त्या व्यवहारासाठी लागणारे 10 लाख रुपये रोख (ten lac rupees cash) त्याच्याकडे दिले होते. पण यशवंत आचार्यने ते दागिने दुकानात न नेता, दागिने आणि रोख रक्कम घेऊन मुंबईतून पळ काढला आणि तो कानपुरमध्ये जाऊन लपला.
आपली फसवणूक झाल्याचे सुरेंद्र आचार्य यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानॉतर व्ही पी मार्ग पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक अविनाश शिंदे, पोलिस उपनिरीक्षक दिलीप तांबे, पोलिस उपनिरीक्षक अभिजीत देशमुख यांच़्या पथकाने तांत्रिक तपास करुन आरोपी उत्तर प्रदेशच्या कानपुरमध्ये लपला असल्याचे शोधून काढले. तिथे एक पथक पाठवून यशवंत आचार्यला ताब्यात घेतले. तेव्हा त्याच्याकडून 78 किलो वजनाचे दागिने ताब्यात घेतले.
यशवंत आचार्यला अटक केल्यानंतर त्याची चौकशी केली तेव्हा तेव्हा चांदीचे त्याने अनेक छोट़्या दुकानांमध्ये विकल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी तपास करुन 33 किलो चांदीचे दागिने आणि जवळपास दिड लाख रुपये रोख रक्तम असा मुद्देमाल जप्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.