Mumbai News SAKAL
मुंबई

Mumbai News: अवैध डेब्रिज फेकणाऱ्यांवर पालिकेचा वॉच; पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

स्वच्छ, सुंदर आणि हरित मुंबईसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार पालिकेकडून व्यापक स्तरावर संपूर्ण स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे.

सकाळ वृत्तसेवा

Mumbai News: वडाळा येथील मोकळ्या मैदानामध्ये डेब्रिज टाकणाऱ्या पाच जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. आठ डम्पर, एक पोकलँड ताब्यात घेतले आहे. संबंधित वाहनाची नोंदणी रद्द करण्याबाबत परिवहन आयुक्तांना लेखी कळवण्याचे निर्देशही अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिले आहेत.

मेहबुब पटेल (बोनसरी गाव), राजू केसबन नायडू (विजय नगर), रामदास मोनू प्रसाद (कुर्ला), मोहम्मद सलीम इबारत अली (भांडुप), उजैर अहमद मोहम्मद इसहार खान (वडाळा) या वाहनचालकांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

स्वच्छ, सुंदर आणि हरित मुंबईसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार पालिकेकडून व्यापक स्तरावर संपूर्ण स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. पालिका प्रशासनाकडून स्वच्छता मोहीम राबविण्यासोबतच रस्ते तसेच सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करून प्रदूषणास कारणीभूत ठरणारी व्यक्ती, बांधकाम व्यावसायिकांविरोधात दंडात्मक, कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे.

पालिकेच्या हद्दीमध्ये डेब्रिज टाकण्यासाठी नियमानुसार परवानगी घेणे बंधनकारक आहे. वडाळा भक्ती पार्क मोनोरेल स्थानकाच्या बाजूला एमएमआरडीएच्या मोकळ्या मैदानामध्ये डम्परमधून काही व्यक्ती डेब्रिज टाकत होते. याची माहिती मिळताच पालिकेच्या पथकाने घटनास्थळी जात कारवाई केली. डेब्रिजने भरलेले चार डम्पर, चार रिकामे डम्पर आणि एक पोकलँड संयंत्र आढळून आले.

‘कॉल ऑन डेब्रिज’ सुविधा

पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्याकडून ‘कॉल ऑन डेब्रिज’ ही सुविधा देण्यात येत आहे. सुमारे ३०० मेट्रिक टनांपर्यंतचा डेब्रिज पालिकेच्या वाहनातून नेत त्याची योग्य विल्हेवाट लावली जाते. यासाठी वाजवी शुल्क आकारले जाते. या सुविधेचा लाभ घेऊन नागरिकांनी नियमानुसार डेब्रिजची विल्हेवाट लावावी. त्यासाठी कोणत्याही अनधिकृत मार्गांचा अवलंब करू नये, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Pune Kondhwa Rape Case : पुणे 'कुरियर बॉय' बलात्कार प्रकरण; आरोपीस अटक अन् धक्कादायक माहितीही उघड!

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

IND vs ENG 2nd Test: २४ वर्षांच्या पोराचे शतक! जेमी स्मिथ-हॅरी ब्रूक्सच्या खेळीने इंग्लंडचा पलटवार; गौतम गंभीरचा फसला प्लॅन

Ulhasnagar Crime : दारू पार्टीतील किरकोळ वादातून मित्राकडून मित्राचा खून; आरोपी शकील शेखला बेड्या

SCROLL FOR NEXT