Dadar McDonalds Bomb Threat Esakal
मुंबई

Mumbai Bomb Threat: "दादरच्या मॅकडोनाल्डमध्ये बॉम्बस्फोट होणार," पोलीस नियंत्रण कक्षाला आलेल्या फोनमुळे खळबळ

Dadar McDonalds: फोन करणाऱ्या नियंत्रण कक्षाला सांगितले की, तो बसमध्ये प्रवास करत होता तेव्हा त्याने दोन लोक मॅकडोनाल्ड उडवण्याबद्दल बोलत असल्याचे ऐकले.

आशुतोष मसगौंडे

रविवारी सकाळी मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला एक फोन आला होता, ज्यामध्ये फोन करणाऱ्याने मुंबईतील दादर भागात असलेल्या मॅकडोनाल्डमध्ये बॉम्बस्फोट होणार असल्याची माहिती दिली.

फोन करणाऱ्या नियंत्रण कक्षाला सांगितले की, तो बसमध्ये प्रवास करत होता तेव्हा त्याने दोन लोक मॅकडोनाल्ड उडवण्याबद्दल बोलत असल्याचे ऐकले.

यानंतर पोलिसांनी सतर्कता दाखवत संपूर्ण तपास केला मात्र त्यांना कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली. (Dadar McDonalds Bomb Threat)

दरम्यान महाराष्ट्रात 20 मे रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मुंबई परिसरातील 6 जागांवर मतदान होणार आहे. त्यामुळे पोलिसांनी हे प्रकरण गांभिर्याने घेतले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पुण्यासह सांगली, मिरज, कोल्हापूर आणि सोलापूरातील रेल्वे स्थानके बॉम्बने उडवून देण्याची धमकी सांगली पोलिसांना फोन करून देण्यात आली होती. त्यानंतर आज सांगली पोलिसांनी मुंबई लोहमार्ग पोलिसांच्या मदतीने आरोपीला अटक केली आहे.

मुंबईत उद्या मतदान

मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य आणि मुंबई दक्षिण अशा मुंबई शहरातील सहा जागांसह ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, नाशिक, धुळे आणि दिंडोरी येथे उद्या मतदान होणार आहे.

उद्याच्या मतदानानंतर महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुका पूर्ण होणार आहेत. त्यामुळे मतदान शांततेत पार पडावे यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT