मुंबई

बोगस लसीकरण: विश्वास नांगरे पाटलांनी दिली महत्त्वाची माहिती

बोगस लसीकरण: विश्वास नांगरे पाटलांनी दिली महत्त्वाची माहिती नक्की कुठे काय अन् कसं घडलं.... सारं काही केलं स्पष्ट Mumbai Police Expose Fake Vaccination Scam in Kandivali Borivali and other places Vishwas Nangare Patil Explains Details

विराज भागवत

मुंबई: शहरात आणि आसपासच्या उपनगरांमध्ये बोगस लसीकरण शिबिरांचे (Fake Vaccination Camps) आयोजन केल्याची बरीच प्रकरणं उघड झाली आहे. या टोळीचा मुंबई पोलिसांनी (Mumbai Police Exposed) पर्दाफाश केला असून या संदर्भातील माहिती देणं महत्वाचं आहे. आतापर्यंत या प्रकरणांमध्ये सात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. गुन्ह्यांची व्याप्ती पाहता विशेष SIT स्थापन केली आहे. गुन्ह्यांचा बारकाईने तपास होणे अपेक्षित असल्यानेच या निर्णय घेण्यात आला आहे, अशी प्रतिक्रिया मुंबईचे सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिली. (Mumbai Police Expose Fake Vaccination Scam in Kandivali Borivali and other places Vishwas Nangare Patil Explains Details)

कसा होता घटनाक्रम

सर्वात पहिलं शिबीर हिरानंदानी येथे आयोजित करून साऱ्यांना कोविशिल्डचे डोस दिले गेले. लस घेतल्याचं प्रमाणपत्र मिळाल्यानंतर जागा आणि वेळा वेगवेगळ्या असल्याने रहिवाशांना याबद्दल संशय आला. नागरिकांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्याचसोबत, फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञानाच्या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट औषधांसदर्भातील गुन्हे तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्याची कलमे यात टाकलेली आहेत.

१२ लाखांची रोकड जप्त; ८ जणांना अटक

कांदिवली येथील गुन्ह्यात एकूण आठ आरोपींना अटक करून १२ लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. मुख्य आरोपींच्या बँकांची खाती गोठवण्यात आली असून शिवम हॉस्पिटलमधून हे डोस घेऊन गेल्याचे समोर आले आहे. त्या डॉक्टरांवरही कारवाई केली आहे. या प्रकरणी २०० जणांचे जबाब नोंदवले आहेत.

सात ठिकाणी गुन्हे दाखल

कांदिवली, वर्सोवा, खार, बोरिवली (२), भोईवाडा, बांगुरनगर अशा सात ठिकाणी गुन्हे दाखल झाले असून समतानगर आणि अंधेरीतही असे प्रकार उघडकीस आले आहेत. या गुन्ह्यात महेंद्र प्रताप सिंह हा नऊ शिबिरांचा प्रमुख आहे. तर संजय गुप्ता हा सर्व गुन्ह्यात सहआरोपी आहे. राजेश पांडे हा कोकिलाबेन रुग्णालयाला सेल्स अधिकारी आहे. याशिवाय, मो. करीम अकबर अली हा मध्यप्रदेशचा रहिवासी सर्व गुन्ह्यात आरोपी आहे. शिवम रुग्णालयातील नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना लस देण्याचे प्रशिक्षण दिलं होतं. चंदन रामसागर हा डेटा सेंटरमधील कर्मचारी आहे. त्याला मॅनेज करून हे सर्व काम सुरू होतं. गुडीया यादव, डॉ. पटारिया यांचा सहभागही निश्चित करण्यात आला. एकूण १६ हजार १०० लस मिळाल्या होत्या. आरोपींनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्याशिवाय, आर्थिक व्यवहार झाले असून त्याचा तपास सुरू आहे, अशी माहिती विश्वास नांगरे पाटील यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Chairman : माळेगाव कारखाना चेअरमनपदी अखेर अजितदादाचं! , विरोधकांच्या आक्षेपावर निवडणूक अधिकारी म्हणाले, आता...

ENGU19 vs INDU19 : १३ चौकार, १० षटकार! वैभव सूर्यवंशीचे विक्रमी शतक; फक्त २३ चेंडूंत चोपल्या ११२ धावा, निघाली इंग्लंडची हवा

Mumbai News: मुंबईत पावसामुळे रस्त्यांची दैना, खड्ड्यांची आकडेवारी समोर, पण पालिकेचा वेगळाच दावा

Cyber Fraud : जळगावात सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार: 'सीबीआय'च्या नावाने निवृत्त डॉक्टरला ३१ लाखांना गंडवले

Top 5 Government Schemes: सरकारच्या तिजोरीतून तुमच्यासाठी खास! ‘पीएम किसान’सारख्या 'या' 5 योजना ठरतील तुमचं आर्थिक कवच

SCROLL FOR NEXT