मुंबई

तोडफोड करणारा 'तो' आरोपी CCTV त कैद, पोलिसांकडून तपास सुरु

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृहावर मंगळवारी रात्री दोन अज्ञातांनी हल्ला केला. घराच्या काचांवर दगडफेक करण्यात आली. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही तोडफोड केली आहे. कुंड्यांचं सुद्धा मोठं नुकसान करण्यात आलं. राजगृह परिसरात तोडफोडीची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून अज्ञात व्यक्तीविरोधात बुधवारी माटुंगा पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तसंच या तोडफोडीचं संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलं आहे. ज्यात हल्लेखोर स्पष्ट दिसत आहे. 

सीसीटीव्ही फुटेजनुसार, हा व्यक्ती राजगृहच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत येताना दिसत आहे. आतमध्ये आल्यानंतर हल्लेखोरानं बाजूला असलेल्या गार्डनमधील 8 ते 10 मोठ्या आकाराच्या कुंड्या पाडून त्याची नासधूस केली आणि त्यानंतर इमारतीच्या बाहेर जाऊन दोन्ही हातांमध्ये दगड आणून त्या दगडांनी इमारतीच्या खिडक्यांच्या काचा फोडल्या. या हल्लेखोरानं आपल्या चेहऱ्यावर सफेद रंगाची प्लास्टिकची पिशवी घातलेली दिसतेय. या हल्लेखोराचं वय पोलिसांनी अंदाजे २५ ते ३० असल्याचं सांगितलं आहे. 

इतकंच काय तर घटनेच्या एक दिवस आधी म्हणजेच सोमवारी ६ जुलैला हा अज्ञात व्यक्ती राजगृहाच्या समोरच्या फुटपाथवर फिरतानाही दिसत आहे. त्या दिवशी त्याला हटकले असता त्याला राग आला होता. या व्यक्तीचा पोलिस सध्या शोध घेत आहेत. 

'राजगृह' तोडफोड प्रकरण

दादर भागात असलेले राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते.  जगभरातील आंबेडकर अनुयायी इथे दररोज भेट देण्यासाठी येत असतात. त्यामुळे या निवासस्थानाला विशेष महत्त्व आहे.  आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे.

राजगृहाबाहेर कडेकोट पोलिस बंदोबस्त

या हल्ल्यानंतर पोलिसांनी या परिसरात मोठा बंदोबस्त ठेवला आहे. आंबेडकरी अनुयायांकडून निदर्शने होण्याची शक्यता असल्यानं मोठा पोलिस फाटा तैनात केला आहे. या परिसरात तीन वायरलेस आणि पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे राजगृहाबाहेर आंबेडकरी अनुयायांनी गर्दी करू नये आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून राजगृहाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसंच राजगृह परिसरात येणाऱ्या नागरिकांची कसून चौकशी करण्यात आली. राजगृहाकडे येणाऱ्या रस्त्यांवरही पोलिस तैनात आहेत. या परिसरातल्या वाहनांचीही तपासणी केली जातेय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT