prasad lad sakal media
मुंबई

मलिक अंबर यांच्या नावाचा लौकीक; राज्य भाजप उपाध्यक्ष प्रसाद लाड यांचा टोला

कलियुगातील मलिक यांनी धुळीस मिळवला

- कृष्ण जोशी

मुंबई : नावात काय आहे असे शेक्सपिअर (Shakespeare) म्हणून गेला आहे. पण इतिहासकालीन स्वामिनिष्ठ कुशल प्रशासक, निजामशाहीचे प्रधान मलिक अंबर (Malik Ambar) यांचा नावाचा लौकीक कलियुगातील मलिक नावाच्या नबाबाने धुळीस मिळवल्याचा टोला भाजपचे राज्य उपाध्यक्ष व आमदार प्रसाद लाड (prasad lad) यांनी लगावला आहे.

मध्ययुगीन भारतात कित्येक नबाब होऊन गेले, त्यातील बहुसंख्य नबाब जनतेची काळजी घेणारे होते. मात्र लोकशाहीतील नबाबाला फक्त आपल्या जावयाची काळजी असल्याचे दिसत असल्याची टीकाही लाड यांनी केली. मलिक नावाच्या व्यक्ती सच्च्या असतात असा आमचा इतिहास कालीन व्यक्तिमत्त्वामुळे झालेला समज आज खोटा ठरला. मलिक अंबर यांनी आपल्या राजाचे राज्य जपण्याचा कसोशीने प्रयत्न केला. तर आजचा मलिक आपल्या राजाचे राज्य धुळीला मिळविण्याचा आटोकाट प्रयत्न करीत असल्याचा टोमणाही त्यांनी मारला.

शहाजीराजांचे मित्र असलेले निजामशाहीचे प्रधान मलिक अंबर यांनी जनतेच्या हितासाठी अनेक चांगले निर्णय घेतले. त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या साह्याने जनतेच्या उपयोगाची कित्येक कामे केली, याबद्दल त्यांचे नाव आदराने घेतले जाते. मात्र कलियुगातील मलिक हा प्रामाणिक अधिकाऱ्यांवर खोटे आरोप करून, त्यांना धमक्या देऊन, त्यांचे मानसिक खच्चीकरण करीत आहे. महाराष्ट्रप्रेमी मलिक अंबर हे व्यसनांच्या तीव्र विरोधात होते. तर 'महा'राष्ट्रवादी आधुनिक मलिक हे व्यसनांशी लढणाऱ्यांच्या विरोधात आहेत, अशा शब्दांत लाड यांनी मलिक यांची खिल्ली उडवली आहे.

मलिक अंबर यांना शेतकरी, तळागाळातील जनता यांच्याबद्दल कणव होती. मात्र नव्या युगातील मलिक यांना तळागाळातील लोकांची काहीही पर्वा नाही. तोंडाने शाहू महाराजांचा, महात्मा फुले यांचा तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जप करीत प्रत्यक्षात त्यांच्या शिकवणीविरुद्ध हे नबाबसाहेब वागतात. जाणत्या राजाच्या तालमीत तयार होऊनही हे मलिक साहेब आपल्या जावयासाठी प्रजेकडे दुर्लक्ष करतात. राज्यकारभाराकडे दुर्लक्ष करून फक्त आपल्या जावयाला वाचविण्याचा व प्रामाणिक अधिकाऱ्यांवर खोटेनाटे आरोप करण्याचा एककलमी कार्यक्रम राबवितात. कलियुगातील आपल्याच नावाच्या या मलिक चे हे प्रताप पाहून स्वर्गातील मलिक अंबर नक्कीच अश्रू ढाळत असतील, अशी गमतीदार टीकाही लाड यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs ENG, T20 WC: “बॉल कुठे, बॅट फिरवतोस कुठे?” बाबर आजमची विकेट चर्चेत; पाकिस्तानचा पायावर कुऱ्हाड मारणारा निर्णय अन् इंग्लंडची सरशी

Latest Marathi News Live Update : सहकारी संस्थांच्या निवडणुकांवरील स्थगिती उठली

Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट! कुणबी प्रमाणपत्र वाटपासाठी समिती स्थापन

GeoSpy AI: नवीन एआय! फोटो कुठे काढला, त्याची माहिती देणार! गोपनियतेबद्दल जगभरातून शंका

चिंता वाढवणारी बातमी! भारताचा स्टार फलंदाज तातडीने संघाची साथ सोडून घरी परतला; आज सरावालाही नाही आला, कारण...

SCROLL FOR NEXT