मुंबई, पुण्यातील गर्दी नियंत्रणासाठी गडकरी यांनी सुचवलाय 'हा' पर्याय! 
मुंबई

मुंबई, पुण्यातील गर्दी नियंत्रणासाठी गडकरी यांनी सुचवलाय 'हा' पर्याय!

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यातील लोकसंख्येने गजबजलेल्या मुंबई, पुणे यांसारख्या शहरांमधून भविष्यात गर्दी कमी करण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे. त्यासाठी मुंबई, पुण्याबाहेर स्मार्ट सिटी अथवा स्मार्ट व्हिलेजची निर्मिती केली पाहिजे, असेही गडकरी यावेळी म्हणाले. एका दूरचित्रवाणी वाहिनीवरील आयोजित कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. 

मला भाषिक अथवा प्रांतीय राजकारण करायचे नसून, मुंबई आणि पुण्यातील गर्दी कमी करण्याचा मुद्दा महत्त्वाचा आहे. त्यासाठी मुंबई बाहेर क्‍लस्टर डेव्हलपमेंटचेही प्रकल्प उभारण्याची गरज आहे. सध्या मुंबईत कोरोना विणाणूचे संकट गंभीर बनले आहे. हे आपल्याला दिसतच आहे. त्यामुळे मुंबई बाहेर स्मार्ट सिटी अथवा स्मार्ट व्हिलेज उभारणे आवश्‍यक आहे. असेही गडकरी यावेळी सांगितले.

महाराष्ट्राकडे मोठी क्षमता असून कोरोनाच्या संकटानंतरही महाराष्ट्र पुन्हा उभारी घेईल. तसेच समुद्रात आणि नद्यांमध्ये सांडपाणी सोडण्याचे प्रमाणही कमी झाले पाहिजे. जेणेकरून पर्यटनासाठीही लोक येतील, असेही ते म्हणाले. भविष्यात पर्यावरणातील प्रदूषण कमी करण्यासाठी सीएनजी, एलएनजी आणि इथेनॉलमिश्रित पेट्रोलवरील वाहने चालवण्यात यावीत, असेही गडकरी यांनी यावेळी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026, MI vs RR: राजस्थान रॉयल्स प्लेऑफमध्ये दाखल! मुबंई इंडियन्सने हरली अन् पंजाब - कोलकाताचंही स्वप्न तोडलं

Karnataka River Drowning Accident : नदीच्या प्रवाहात अचानक वाढ, शिंपले गोळा करण्यासाठी गेलेले ८ जण बुडाले; ७ महिलांचा समावेश

Jalna Water Crisis: अंबड तालुक्यातील मसई गावात पाण्यासाठी जीवघेणी कसरत; विजपंप बंद, ग्रामस्थांची उन्हात तहानलेली धावपळ

IPL 2026: अजिंक्य रहाणेच्या KKR ला धक्का! १८ कोटींचा खेळाडू स्पर्धेतून बाहेर; शेवटच्या साखळी सामन्यापूर्वी बदली खेळाडूची घोषणा

Latest Marathi News Live Update : चांदवड-मनमाड रस्त्यावर भीषण अपघात; वाहन उलटून २१ मजूर जखमी

SCROLL FOR NEXT