Railway megablock sakal media
मुंबई

रविवारी मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वेवर मेगाब्लाॅक

कुलदीप घायवट

मुंबई : मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वेवर (Railway mega block) रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा, ओव्हर हेड वायर यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी (railway repairing work) रविवारी (ता.3) रोजी मेगाब्लॉक घेण्यात येईल. पश्चिम रेल्वेवर (western railway) शनिवारी-रविवारी रात्रकालीन ब्लाॅक घेण्यात येईल.

कुठे : ठाणे- दिवा अप आणि डाऊन धीम्या मार्गावर

कधी : सकाळी 11.00 ते दुपारी 4.00 वाजेपर्यंत

परिणाम : ब्लाॅकदरम्यान मुलुंडहून डाऊन दिशेकडे जाणाऱ्या लोकल दिवा स्थानकापर्यंत जलद मार्गावर धावतील. या लोकल ठाणे आणि दिवा येथे थांबा घेतील. तर, कल्याणहून अप दिशेकडे जाणाऱ्या लोकल दिवा, मुलुंड दरम्यान जलद मार्गावर धावतील. या लोकल दिवा आणि ठाणे येथे थांबा घेतील. मुलुंड नंतर धिम्या लोकल सर्व स्थानकावर थांबतील.

कुठे : पनवेल- वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर (बेलापूर- खारकोपर सेवा प्रभावित होणार नाहीत; नेरुळ- खारकोपर सेवा रद्द राहतील)

कधी : सकाळी 11.05 ते संध्याकाळी 4.05 वाजेपर्यंत

परिणाम : ब्लाॅकवेळी हार्बर मार्गावर सीएसएमटी ते पनवेल, बेलापूर दरम्यानची अप आणि डाऊन सेवा रद्द केल्या जातील. पनवेल-ठाणे अप आणि डाऊन मार्गावरील ट्रान्स हार्बर मार्गावरील, नेरुळ-खारकोपर अप आणि डाऊन लोकल सेवा बंद राहील.

ब्लॉक कालावधी दरम्यान बेलापूर- खारकोपर दरम्यान लोकल सेवा वेळापत्रकानुसार चालतील. ब्लॉक काळात सीएसएमटी - वाशी दरम्यान विशेष लोकल चालविण्यात येतील. ब्लॉक कालावधी दरम्यान ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा उपलब्ध असतील.

कुठे : माहिम ते मुंबई सेंट्रल अप आणि डाऊन धीमी मार्गावर

कधी : शनिवारी-रविवारच्या रात्री 11.50 ते पहाटे 4.50 वाजेपर्यंत

परिणाम : ब्लाॅकवेळी अप दिशेकडील धीम्या मार्गावरील सर्व लोकल माहिम ते मुंबई सेंट्रल दरम्यान अप जलद मार्गावर धावेल. त्यामुळे माहिम, माटुंगा रोड, प्रभादेवी, लोअर परळ आणि महालक्ष्मी येथे या लोकल थांबणार नाही. चर्चगेट स्थानकावरून रात्री 1 वाजता बोरीवलीकडे सुटणारी गाडी चर्चगेटवरून 1.25 वाजता सुटेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026 Wishes in Marathi: "गजानना श्री गणराया..." गणेश चतुर्थीनिमित्त प्रियजनांना पाठवा गणेशभक्तीने ओथंबलेल्या खास मराठी शुभेच्छा

टीम इंडियाने नक्वींकडून आशिया कपची ट्रॉफी का घेतली नाही? BCCIने सांगितलं कारण

Ganesh Chaturthi 2026: गणेशभक्तांनो, मुहूर्ताची वेळ लक्षात ठेवा! पहाटे ४.५० ते दुपारी १.५१ पर्यंत गणरायाची प्रतिष्ठापना

Bombay High Court: ‘स्मोकिंग तंबाखू’ खाद्यपदार्थ नाही; एफएसएस कायद्यानुसार कारवाई करता येणार नाही, नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Marathi News Live Updates : कसबा गणपती मंदिरासमोर ढोल-ताशांचा गजर; ‘भेसळ रोखा’चे फ्लेक्स लक्षवेधी

SCROLL FOR NEXT