Mumbai Road  Sakal
मुंबई

Mumbai News : मुंबईच्या रस्त्यांवर खड्ड्यावर रिॲक्टीव्ह अस्फाल्टचा उतारा

खड्डा भरल्यानंतर अवघ्या दोन तासांत रस्ते वाहतूक सुरू करणे शक्य

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - मुंबईतील खड्डे भरण्यासाठी यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच रिॲक्टीव्ह अस्फाल्ट या तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. या कामासाठी पालिका क्षेत्रात विभागनिहाय कामासाठीची जबाबदारी निश्चित करून खड्डे बुजवण्यासाठी तरतूद केली आहे.

खार भुयारी मार्ग येथे काल खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले. याठिकाणी रिअॕक्टिव्ह अस्फाल्टचा वापर करून तात्काळ रस्ते वाहतूक पूर्ववत करण्यात आली. या पथदर्शी प्रकल्पामध्ये मिश्रणाच्या वापराचा यशस्वी परिणाम आढळून आल्याचे पालिकेने म्हटले आहे.

मिश्रणाचा वापर मुंबईत करण्याचा निर्णय पालिकेच्या रस्ते विभागाने घेतला आहे. रस्ते विभागाने प्रत्येक विभागनिहाय हे मिश्रण रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी पुरवले आहे.

असा होतो वापर

रिॲक्टीव्ह अस्फाल्ट हे केमिकल मिश्रीत डांबर आहे. रिॲक्टीव्ह अस्फाल्टच्या मिश्रणावर पाणी टाकूनच खड्डा भरण्यात येतो. केमिकलची पावडर, खडी आणि पाणी या मिश्रणाचा वापर खड्डे बुजवण्यासाठी करण्यात येतो.

रिअॅक्टीव्ह अस्फाल्टमधील केमिकल पावडरवर पाण्याचा कोणताही परिणाम होत नाही. दोन तासांमध्ये वाहतूक सुरू करता येते.

रॅपिड हार्डनिनिंग आणि कोल्डमिक्सचाही वापर

गेल्या वर्षी रॅपिड हार्डनिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला होता. तंत्रज्ञानाच्या वापरासाठी नऊ सेवा पुरवठादारांच्या रॅपिड हार्डनिंगचा वापर करण्यात येईल. मुंबईतील सर्व विभागात आतापर्यंत १३०० मेट्रिक टन कोल्डमिक्स खड्डे बुजवण्यासाठी पुरवण्यात आले आहे. तर २०० मेट्रिक टन कोल्ड मिक्स राखीव ठेवण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithvi Shaw : ११ चौकार, १ षटकार! पृथ्वीच्या आक्रमक खेळीमुळे वैभव सुर्यवंशीचे विश्वविक्रमी शतक व्यर्थ; महाराष्ट्राचा बिहारवर विजय

मुंबई- पुणे नाही तर 'या' ठिकाणी सुरू आहे सोहम बांदेकर आणि पूजा बिरारीचा विवाहसोहळा; पाहुणे कोण कोण आले पाहिलंत का?

Mumbai Crime: आधी मिठी, गाल ओढून चावण्याचा प्रयत्न, नंतर गुप्तांगाला...; ६० वर्षीय नराधमाचे चिमुकल्यासोबत नको ते कृत्य; मुंबईत खळबळ

Latest Marathi News Live Update : परभणीच्या जिंतूर नगरपरिषद मतदानादरम्यान तणाव

माेठी बातमी ! 'शासकीय कर्मचारी, अधिकारी कर्मचाऱ्यांनी घेतला 'लाडकी बहीण'चा लाभ'; शासनाच्या आदेशाला केराची टाेपली !

SCROLL FOR NEXT