Mumbai-Rains-MNS 
मुंबई

"मुंबईत जिथे कधीच पाणी तुंबायचं नाही तिथेही आज पाणी साचलंय"

मनसेच्या संदीप देशपांडेंची घणाघाती टीका, काँग्रेसची पालिकेवर नाराजी

विराज भागवत
  • मनसेच्या संदीप देशपांडेंची घणाघाती टीका, काँग्रेसची पालिकेवर नाराजी

मुंबई: शहर, उपनगरात (Suburban), ठाणे (Thane), नवी मुंबई (Navi Mumbai), पनवेल (Panvel), कल्याण (Kalyan), पालघर (Palghar) या विभागांमध्ये पहाटेपासूनच मुसळधार पावसाला (Heavy Rainfall) सुरूवात झाली. पावसाचा जोर प्रचंड असल्याने अपेक्षेनुसार, सखल भागांमध्ये पाणी तुंबले. रेल्वेसेवा, बस सेवा, रस्ते वाहतूक सगळ्यावरच परिणाम झाला. पहिल्याच पावसाचा फटका मुंबईला जोरदार बसला. मुंबई पालिकेने नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा केला होता, पण तो दावाच पावसाच्या पाण्यात अक्षरश: वाहून गेला. याबाबत बोलताना मनसे नेते व प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी महत्त्वपूर्ण मत नोदवलं. "मुंबईतील सखल भागात पाणी साचणार हे लोकांनी स्वीकारलं आहे पण जिथे आधी पाणी तुंबत नव्हतं तिथेही आज पाणी तुंबलंय ही चिंतेची गोष्ट आहे", असे ते म्हणाले. (Mumbai Rains MNS Sandeep Deshpande Congress Ravi Raja slams Shivsena led Mumbai BMC Administration over rains affected city)

"पावसाळ्यात मुंबईच्या सखल भागात पाणी तुंबायचं ही गोष्ट लोकांनी स्वीकारलीच होती. पण एक महत्त्वाची बाब म्हणजे यावेळी जिथे सखल भाग नाही, अशा दक्षिण मुंबईतील भागात किंवा इतर उपनगरीय भागातदेखील पाणी तुंबल्याचं किंवा साचल्याचं चित्र आहे. जिथे आजपर्यंत कधीही पाणी तुंबत नव्हतं तिथेही आता पाणी तुंबायला लागलंय ही गांभीर्याची गोष्ट आहे. नुसती वरवरची उपाययोजना करून मुंबईकरांना दिलासा मिळणं शक्य नाही. ठिकठिकाणी चालू असलेली मेट्रोची कामं, वरळीच्या कोस्टल रोडची कामं यामुळे अशाप्रकारे पाणी तुंबताना दिसत आहे. त्यामुळे एक लक्षात घेणं गरजेचं आहे विकास करताना इतरांची गैरसोय होऊ नये", असा सल्ला त्यांनी दिला.

"पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या पर्जन्य जलवाहिन्यांची साफसफाई तीन वेळा करायला हवी. पण पालिकेकडून या गोष्टी करण्यात आलेल्या नाहीत. ब्रिटीशकालीन लोकांनी ही सुविधा ठेवली आहे, पण त्या वाहिन्यादेखील साफ करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे ही परिस्थिती ओढवली आहे", असेही ते म्हणाले.

"मुंबई महानगर पालिकेने १०४ टक्के नालेसफाई झाल्याचा जो दावा केला होता त्याची पोलखोल झाली. चार दिवस आधी काँग्रेसचे पदाधिकारी आणि मी स्वत: नालेसफाईची पाहणी केली आणि प्रशासनाला सांगितलं की हे काम अद्याप नीट झालेलं नाहीये. पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. सध्या चित्र असं आहे की पहिल्या पावसात मुंबई पूर्णपणे तुंबली आहे. याची जबाबदारी निश्चितच मुंबई पालिकेची आहे. पालिका ७० कोटी रूपये खर्च करून नालेसफाई करते मग त्याचं काय झालं. १५ मे रोजी मुंबई पालिका सर्व काम संपवून सज्ज असायला हवी होती. पण सध्या चित्र फारच विचित्र आहे", असे मत पालिकेतील काँग्रेसचे गटनेते रवी राजा यांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video Tarabai Memorial : औरंगजेबाला गाडणाऱ्या ताराराणींचे पन्हाळ्यावर स्मारक का नाही? सर्वपक्षीय नेत्यांना चॅलेंज देणारा व्हिडिओ...

Vijay Hazare Trophy : वैभव सूर्यवंशीने इतिहास रचला! अवघ्या ३६ चेंडूंत झळकावले शतक; मोडला शाहिद आफ्रिदीचा विक्रम...

चारित्र्याच्या संशयावरुन भयंकर शेवट; सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीने बँकर पत्नीची गोळ्या झाडून केली हत्या, दोन मुलं असतानाही उचललं टोकाचं पाऊल

BMC Election: मुंबईचं राजकारण हादरलं! उद्धव–राज ठाकरे युतीचा गुप्त फॉर्म्युला समोर, थेट संघर्ष होणार... महायुतीची तातडीची बैठक!

Panchang 24 December 2025: आजच्या दिवशी नारायण कवच या स्तोत्राचे पठण आणि ‘बुं बुधाय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT