plasma  
मुंबई

'या' थेरपीद्वारे कोरोनाला थोपवण्याची मुंबईत तयारी, फक्त...

सकाळवृत्तसेवा

मुंबई : कोरोना विषाणूला संपवू शकेल, अशी लस अद्याप तयार झालेली नाही. परंतु, जुनीच प्लाझ्मा उपचारपद्धती परिणामकारक ठरत आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने या आजारातून बऱ्या झालेल्या रुग्णांना रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. आता फक्त कोरोनामुक्त झालेल्यांना यासाठी रक्तदान करायची आवश्यकता आहे.

कोरोनाची बाधा रोखण्यासाठी कोणतीही लस नसली, तरी माणसाच्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती या विषाणूला वरचढ ठरत आहे. रोगप्रतिकारक शक्तीच्या जोरावरच रुग्ण बरे होत आहेत. त्यामुळे आता प्लाझ्मा थेरपी म्हणजे रक्तद्रव उपचार पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे. भारतात केरळमध्ये हा प्रयोग करण्यात येणार असून, केंद्र सरकारनेही मान्यता दिली आहे. चीन, अमेरिका, दक्षिण कोरिया आदी देशांतही प्लाझ्मा थेरपी उपयुक्त ठरली आहे. 

या उपचारपद्धतीत कोरोनामुक्त व्यक्तींच्या रक्तातील प्लाझ्मा रुग्णाला दिला जाईल. असे उपचार फक्त अत्यवस्थ रुग्णांवर केले जाण्याची शक्‍यता आहे. त्यानुसार आजारातून बरे झालेल्या व्यक्तींना रक्तदान करण्याचे आवाहन करत आहोत. भारतीय वैद्यक संशोधन परिषदेच्या निर्देशांनुसार पुढील निर्णय घेण्यात येतील, असे महापालिकेच्या उप आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी सांगितले. 

नक्की काय होते? 

  • रोगप्रतिकारक शक्ती बळावलेल्या कोरोनामुक्त व्यक्तींच्या रक्तद्रवात प्रतिपिंडे तयार होतात. 
  • अशा व्यक्तीच्या रक्तद्रवामार्फत प्रतिपिंडे कोरोनाबाधिताच्या शरीरात पोहोचवली जातात. 
  • ही प्रतिपिंडे लसीप्रमाणे काम करून कोरोना रुग्णाच्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती तयार करतात.

 Mumbai ready to fight with Corona with this therapy


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT