corona 
मुंबई

दिलासा! मुंबईत कोरोना रूग्ण बरे होणाऱ्यांची टक्केवारी वाढली

मुंबईमध्ये नव्या कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत आहे.

निनाद कुलकर्णी

मुंबई : मुंबईमध्ये कोरोना ( Corona Cases In Mumbai ) रूग्ण बरे होण्याच्या टक्केवरीत वाढ नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनसह नागरिकांना काहिसा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, मुंबईत गेल्या 24 तासांत 1,312 नव्या कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली आहे, तर 10 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (Mumbai Latest Corona Update In Marathi )

मागील 24 तासांत मुंबई 1 हजार 312 नवे कोरोना (Corona) रुग्ण आढळून आले असून, 24 तासांत तब्बल 4 हजार 990 जणांनी कोरोनावर मात केली आहे. (Active Corona Cases In Mumbai) सध्या मुंबईचा रूग्ण बरे होण्याचा रेटमध्ये एक टक्क्याने वाढ झाली असून हा रेट 97 टक्के इतका नोंदविण्यात आला आहे. सद्यस्थितीला मुंबईत 14 हजार 344 सक्रिय कोरोनारुग्ण आहेत.कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 16 हजार 591 इतकी झाली आहे.

दरम्यान, ओमिक्रॉन (Omicron Variant) व्हेरिएंटमुळे काही दिवासांपूर्वी राज्यात आणि मुंबईमध्ये कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ नोंदविण्यात येत होती. एकट्या मुंबईमध्ये ही संख्या 20 हजारांपुढे नोंदविण्यात येत होती. त्यामुळे प्रशासनासह नागरिकांच्या चिंतेत भर पडली होती. तसेच रूग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेकडून काही निर्बंध (Covid 19 restriction In Mumbai) लागू करण्यात आले होते. दरम्यान, आता नव्या बाधितांपेक्षा कोरोनामुक्त होण्याऱ्यांची संख्या वाढत असल्याने प्रशासनासह नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT