Mumbai  sakal
मुंबई

Mumbai : पाईपलाईन मधून चालवतात 'ते' दुचाकी; कल्याण शीळ रोडवरील कोंडी टाळण्यासाठी दुचाकीस्वारांची कसरत

ठिकठिकाणी सुरू असलेल्या या कामामुळे या मार्गावर सकाळ संध्याकाळ प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी होते.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - कल्याण शीळ रोडवरील वाहतूक कोंडी ही वाहनचालकांची रोजची डोकेदुखी झालेली आहे. या कोंडीतून मार्ग काढण्यासाठी दुचाकीस्वार मिळेल त्या चिंचोळ्या मार्गातून आपली दुचाकी काढताना दिसतात.

आता तर या दुचाकीस्वारांनी हद्दच केली आहे. चक्क पाण्याच्या पाईपलाईन मधून चालकांनी मार्ग काढत कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला आहे. देसाई गावाजवळील हा व्हिडीओ समाज माध्यमावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे.

कल्याण शीळ रोडचे सिमेंट काँक्रीटीकरणचे काम सुरू आहे. ठिकठिकाणी सुरू असलेल्या या कामामुळे या मार्गावर सकाळ संध्याकाळ प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी होते. वाहनांची वाढलेली संख्या, कल्याण शीळ रोडचे काही ठिकाणी रखडलेले रुंदीकरण, रस्त्याची सुरू असलेली कामे आदी अनेक कारणे या कोंडीस कारणीभूत आहेत.

देसाई गाव, काटई नाका, पलावा जंक्शन अशी कोंडीची अनेक ठिकाणे आहेत. सकाळ संध्याकाळ या भागात वाहन कोंडी होते. चारचाकी वाहनांच्या रांगा इथे लागत असल्याने दुचाकीस्वार रस्त्याच्या कडेने,

विरुद्ध दिशेने, कच्चा रस्ता तसेच मिळेल त्या अरुंद मोकळ्या जागेतून मार्ग काढताना दिसतात. या दुचाकीस्वारांमुळे देखील अनेकदा कोंडीत भर पडते. मात्र ते काही ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात.

दुचाकीस्वार कोंडीतून कसे वाहन काढतील याचा काही एक नेम नसताना आता एक नवा मार्ग दुचाकीस्वारांनी देसाई गावाजवळ शोधून काढला आहे. चक्क पाईपलाईन मधून मार्ग काढून तेही विरुद्ध दिशेने वाहन चालवत ते मार्गस्थ होत आहेत.

आधीच वाहतूक कोंडी होत असताना विरुद्ध दिशेने बेशिस्तपणे गाडी चालवणाऱ्या वाहन चालकांमुळे या वाहतूक कोंडीत भर पडत असल्याने इतर वाहन चालक त्रस्त असताना देसाई गावाजवळ विरुद्ध दिशेने छुप्या मार्गाने येणाऱ्या या दुचाकीस्वारांची त्यात भर पडली आहे.

गुरुवारी सायंकाळी देसाई गाव परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी काही बहाद्दरानी चक्क विरुद्ध दिशेनेपाईपलाईन मधून दुचाकी नेल्या. एका ग्रामस्थांने त्यांचा व्हिडीओ काढला असून हा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल होत आहे. वाहतूक पोलिस आता या दुचाकीस्वारांचा हा छुपा मार्ग कसा बंद करतात हे पाहणे महत्वाचे ठरेल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugar Price Hike Maharashtra : साखरेचे भाव क्विंटलमागे 900 रुपयांनी घसरले; तरीही किरकोळ बाजारात दर 67 रुपयांवर, फायदा साठेबाजांचाच?

कोकण आपलोच आसा! सनई चौघडे मालिकेची टीम पोहचली कणकवलीत, फोटो पाहिलेत का?

MPSC Paper Leak: परीक्षा झाली, मुलाखतीही झाल्या; मग MPSC ने संपूर्ण भरतीच का रद्द केली? पेपरफुटीचा मुद्दा पुन्हा चर्चेत

Latest Marathi News Live Update : टीम कुक ‘ॲपल’ची धुरा सोडणार

Kolhapur Gender Determination Case: गर्भलिंग निदानप्रकरणी ‘एस.पी. टोळी’ला मोका; राज्यातील पहिलीच कारवाई; ११ जणांवर बडगा

SCROLL FOR NEXT