thief arrested sakal media
मुंबई

मुंबई : लोकलमधून बॅग चोरी करणारा सराईत गुन्हेगार अटकेत

एक लाख 34 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी घेतला ताब्यात

कुलदीप घायवट

मुंबई : उपनगरीय लोकलमधील (Mumbai train) प्रवाशांची संख्या (commuters) दिवसेंदिवस वाढत आहे. प्रवाशांच्या संख्येसह गुन्हेगारीचा आकडा (crime) देखील वाढत आहे. परिणामी, यामध्ये प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू, मोबाईल चोरीला (robbery) जात आहेत. या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी रेल्वे पोलिसांच्या (railway police) गुन्हे शाखा पथकाने नुकताच लोकल डब्याच्या रॅकवरील बॅग चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला जेरबंद (thief arrested) केले आहे. तर, त्याच्याकडून एक लाख 34 हजारांचे तीन लॅपटाॅप असा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

उपनगरीय लोकलमधून प्रवास करणारे प्रवासी सर्रासपणे बॅग रॅकवर ठेवतात. याचाच फायदा घेत गुन्हेगार प्रवाशाचे लक्ष विचलित करून अथवा प्रवाशाचे बॅगवर लक्ष नसताना, चोरी केली जाते. 15 ऑगस्ट रोजी कोरोनाचे दोन डोस घेतलेल्या लसवंताचा प्रवास सुरू झाला. त्याचदिवशी विनय मुच्छाल (33) या प्रवाशाने वाशी रेल्वे पोलीस ठाण्यात रॅकवर ठेवलेली बॅग लॅपटाॅपसह चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलिसांच्या आदेशानुसार या घटनेचा समांतर तपास वांद्रे युनिट गुन्हे शाखेद्वारे करीत होते.

यामध्ये रॅकवरील बॅग चोरी करणाऱ्या किंवा अशाप्रकारचे गुन्हे करणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपी आणि त्यांनी केलेल्या गुन्ह्यांबाबत गुप्त माहितीदाराकडून शोध घेतला असता, वाशी रेल्वे पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील गुन्हेगार नेरूळ येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर नेरूळ येथे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सापळा रचून पोलीस आयुक्तालयातील सराईत गुन्हेगार तोसीफ राजा ताजुद्दिन शेख (29) याला ताब्यात घेण्यात आले. शेख याची सखोल चौकशी केली असता, रॅकवर ठेवलेली बॅग लॅपटाॅपसह चोरी केल्याचे सांगितले.

त्यानंतर रेल्वे पोलिसांनी 71 हजार रूपये किंमतीचा आणि 32 हजार 500 रुपये किंमतीचा, 30 हजार 500 रुपये किंमतीचा असे एकूण एक लाख 34 हजार रुपये तीन लॅपटाॅप हस्तगत केले. आरोपी शेख याच्यावर वडाळा रेल्वे पोलीस ठाण्यात दोन, दादरमध्ये पाच, कुुर्लामध्ये तीन, पनवेलमध्ये दोन गुन्हे दाखल केली असून यामध्ये अजामीनपात्र वॉरंट पेडिंग आहे, अशी माहिती रेल्वे पोलिसांकडून देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Fire: जंगली महाराज रोडवर भीषण आग! पेट्रोल पंपामागील गॅरेज जळून खाक, अग्निशमन दलाच्या ५ गाड्या दाखल

Stock Market : आज शेअर बाजारात या PSU शेअरचा जलवा! गुंतवणूकदार मालामाल; जाणून घ्या पुढे काय?

Kolhapur Fraud Case : तीन वर्षांपासून पसार असलेला ग्रोबझ फसवणुकीतील आरोपी अखेर जेरबंद; २६ हजार गुंतवणूकदारांच्या पैशांचा तपास वेगात

स्टार प्रवाहाने पाच स्लॉट गमावले; टीआरपीमध्ये झी मराठीची चलती; 'तारिणी', 'कमळी'नंतर आणखी एका मालिकेचा जलवा

ठाकरे गट, काँग्रेस आणि भाजप आमनेसामने! मतदार कुणाकडे झुकणार? वाचा BMC निवडणुकीत अंधेरी पश्चिमचे समीकरण

SCROLL FOR NEXT