मुंबई

मुंबईतील व्यापाऱ्यांची उद्धव ठाकरेंना कळकळीची विनंती म्हणाले...

व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे....

दीनानाथ परब

मुंबई: कोरोनाची साखळी (corona chain) तोडण्यासाठी लॅाकडाऊन १ जून पर्यंत वाढवण्यात आला आहे. राज्यात १४ मे पर्यंत लागू असलेले कठोर निर्बंध हे आणखी १५ दिवस कायम असणार आहेत. त्यामुळे व्यापारी वर्गामध्ये (Mumbai traders) नाराजीची भावना आहे. "लॉकडाउनच्या पुढच्या टप्प्यात व्यापाऱ्यांचा निभाव लागणं कठीण आहे. मुंबई-महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांचा लॉकडाउनला विरोध आहे" असे व्यापारी फेडरेशन ॲाफ असोसिएशन ॲाफ महाराष्ट्रचे अध्यक्ष विनेश मेहता यांनी सांगितले. (Mumbai traders requested to chief minister uddhav thackeray about relaxation in lockdown)

"१ ते १५ तारीखपर्यंत आम्ही साथ दिली. व्यापारी समाज तुमच्यासोबत आहे. मुंबई आमची कर्मभूमी आहे. आम्ही इथले भूमिपुत्र आहोत. तुम्ही आमच्या मागणीचा विचार करा" असे मेहता यांनी म्हटले आहे. "आम्ही दोन प्रस्ताव दिले आहेत. मार्गदर्शकतत्त्व घालून देऊन सकाळी ९ ते ४ किंवा एकदिवसाआड दुकाने उघडण्याची परवानगी द्या, या परिस्थितीत व्यापाऱ्यांसाठी तगून राहणे कठीण आहे" असे विनेश मेहता म्हणाले.

"आज व्यवसाय ठप्प आहे. व्यापाऱ्यांचा निभाव लागणे कठीण आहे. मासिक हप्ता, वेतन आणि दुकानांची भाडी द्यायची आहेत. आमच्या मागण्यांचा पूनर्विचार करुन, लवकरात लवकर सकारात्मक प्रतिसाद द्या" अशी मागणी त्यांनी केली.

लॅाकडाऊन कालावधी वाढवल्यामुळे व्यापारी, छोटे दुकानदार यांना मात्र मोठ्या आर्थिक तोट्याला सामोर जाव लागत आहे. यासंदर्भात व्यापारी फेडरेशन ॲाफ असोसिएशन ॲाफ महाराष्ट्रचे अध्यक्ष विनेश मेहता यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र देखील लिहिले आहे. पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे या लॅाकडाऊन मध्ये काही अटी कमी करण्याची देखील कळकळीची विनंती केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Changur Baba : अंगठ्या अन् रत्न विकायचा, ५ वर्षात जमवली १०० कोटींची माया; धर्मांतर रॅकेट प्रकरणी अटक केलेला छांगुर बाबा कोण?

बौद्ध धर्मगुरू दलाई लामांना 'भारतरत्न' देण्याची मागणी; 80 खासदारांनी केली पाठिंबा दर्शवणारी स्वाक्षरी, मोदी सरकार घेणार लवकरच निर्णय?

Guru Purnima 2025 Greeting Card: गुरुपौर्णिमेनिमित्त गुरूंसाठी बनवा खास ग्रीटिंग कार्ड, जाणून घ्या सोपी पद्धत

Oxford Graduate: ऑक्सफर्ड विद्यापीठाचा पदवीधर करतोय फूड डिलिव्हरी; दरमहा कमावतोय लाखो रुपये, म्हणाला...

Solapur Crime: निर्दयी मुलाने बापाला चाबकाचे फटके देऊन संपविले, घरात रक्ताचा पाट वाहिला तरी...सोलापूर हादरले !

SCROLL FOR NEXT