मुंबई : पारंबदर प्रकल्पाच्या पहिल्या गाळाच्या उभारणीला बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला.  
मुंबई

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प 2022 पूर्वी मार्गी लागणार!

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबई-पारबंदर (मुंबई ट्रान्स हार्बर लिंक) प्रकल्प हा मुंबई-नवी मुंबईला जोडणारा भारतातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून सप्टेंबर 2022 पर्यंत तो पूर्ण होईल, असा विश्‍वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. या प्रकल्पाच्या समुद्रावरील सर्वांत लांबीच्या पुलाच्या पहिल्या गाळ्याची उभारणी बुधवारपासून (ता. 15) सुरू झाली. ठाकरे यांच्या हस्ते कळ दाबून गर्डरच्या कामाचा प्रारंभ करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. 
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, की या प्रकल्पासाठीचा कालावधी 54 महिन्यांचा असला, तरी सध्या त्याचे काम वेगाने सुरू आहे. त्यामुळे मुदतीपूर्वी हा प्रकल्प पूर्ण होईल. या प्रकल्पामुळे दक्षिण मुंबई नवी मुंबईला जोडली जाणार असून राज्यातीलच नव्हे, तर देशातील हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या वेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खासदार अरविंद सावंत, आमदार अजय चौधरी आदी उपस्थित होते. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त संजय खंदारे यांनी या वेळी प्रकल्पाचे सादरीकरण केले. 

असा आहे प्रकल्प... 
- मुंबई शहरातील शिवडी आणि मुख्य भूमीवरील न्हावा यांना जोडणारा सुमारे 22 कि.मी.चा सहापदरी पूल 
- या पुलाची समुद्रातील लांबी 16.5 कि.मी., जमिनीवरील पुलाची एकूण लांबी सुमारे 5.5 
- हा समुद्रावरील भारतातील सर्वाधिक लांबीचा पूल ठरणार आहे. 

प्रकल्पाची सद्यस्थिती... 
- जपान आंतरराष्ट्रीय सहकार संस्थेच्या अर्थात, जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी (जेआयसीए)कडून प्रकल्पाला कर्जसाह्य 
- तीन स्थापत्य कंत्राटद्वारे आणि एका इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट सिस्टीम कंत्राटाद्वारे प्रकल्पाचे काम 
- प्रकल्पाची डिसेंबर 2019 अखेर सुमारे 19 टक्के आर्थिक प्रगती. पुलाच्या पायाचे आणि स्तंभांच्या उभारणीचे काम प्रगतिपथावर 
- सेगमेंट कास्टिंग व तात्पुरत्या पुलाच्या उभारणीचे काम प्रगतिपथावर 
- प्रकल्पाच्या कामाचा कालावधी सुमारे साडेचार वर्षे. सप्टेंबर 2022 पर्यंत पूर्णत्वाचे नियोजन.


आशादायी ः मुंबई ते ठाणे प्रवास आणखी वेगवान 

मुंबई ते नवी मुंबई 
अवघ्या अर्ध्या तासात
 
शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यात मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर दररोज अंदाजे 70 हजार वाहने या पुलावरून धावतील. या मार्गामुळे मुंबईतून दोन तासांऐवजी अवघ्या अर्ध्या तासात नवी मुंबई गाठता येईल, असा विश्‍वास "एमएमआरडीए'ने व्यक्त केला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: KL Rahul ने झेल सोडला! शुभमन गिल अम्पायरसोबत भांडला; Umpire ने मागे ढकलले अन् म्हणाले, जा...

Valhe News : बँकेबाहेर विसरलेली सव्वा लाखाची रोकड असलेली पिशवी दांपत्यास केली परत

Video: बापरे! प्रार्थना बेहरेच्या पायाला गंभीर दुखापत, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'तुमच्या आशिर्वादाची...'

Viral Video: हत्तीच्या बाळाची टरबूज मागण्याची क्यूट अदा, हृदयस्पर्शी व्हिडिओने जिंकली नेटकऱ्यांची मने

Thane Crime: कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ, धक्कादायक आकडेवारी समोर

SCROLL FOR NEXT