File Photo 
मुंबई

मुंबई विद्यापीठाला मिळेना नॅकसाठी मुहूर्त

तेजस वाघमारे

मुंबई : ऐतिहासिक वारसा लाभलेले मुंबई विद्यापीठ अडीच वर्षांपासून नॅक (राष्ट्रीय मूल्यांकन व प्रत्यायन परिषद) मूल्यांकन मिळवण्यात अपयशी ठरले आहे. दुसरीकडे महाविद्यालयांना नॅक मूल्यांकनाची सक्ती करणाऱ्या मुंबई विद्यापीठाने वर्षभरापासून नॅक मूल्यांकन प्राप्त करण्यासाठी काम सुरू केले आहे, परंतु अद्यापही याबाबतचा प्रस्ताव राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रत्यायन परिषदेकडे पाठवण्यासाठी विद्यापीठाला मुहूर्त मिळालेला नाही. नॅक मूल्यांकनाअभावी विद्यापीठाला निधीपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे नवीन वर्षात विद्यापीठ नॅक मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.

मुंबई विद्यापीठाच्या नॅक मूल्यांकनाची मुदत २० एप्रिल २०१७ रोजी संपुष्टात आली. त्यानंतर नॅक मिळवण्यासाठी तत्कालीन कुलगुरूंच्या कालावधीत कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत. विद्यापीठाला २१ एप्रिल २०१२ मध्ये नॅक मूल्यांकन मिळाले होते. त्याची मुदत संपण्यापूर्वीच विद्यापीठाने नवीन नॅक मूल्यांकनासाठी अर्ज करणे अपेक्षित होते; मात्र विद्यापीठ प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहिले नाही. विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांना नॅक मूल्यांकन घेणे सक्तीचे केले असताना दुसरीकडे विद्यापीठालाच नॅक मूल्यांकन नसल्याने विद्यापीठ प्रशासनाला विविध क्षेत्रातून टीकेचे धनी बनावे लागले आहे.

विद्यापीठाचा अहवाल अंतिम टप्प्यात!
गेल्या वर्षी विद्यापीठाला प्रा. सुहास पेडणेकर यांच्या रूपाने नवीन कुलगुरू मिळाल्यानंतर त्यांनी नॅकची प्रक्रिया सुरू केली. यासाठी विद्यापीठाने एक समितीही तयार केली आहे. तसेच याबाबत आवश्‍यक असणाऱ्या सुविधांची पूर्तताही करण्यात येत आहे. मूल्यांकन करताना अभ्यासक्रम, शिक्षक प्रशिक्षण, संशोधन, पायाभूत सुविधा, विद्यार्थ्यांचे पाठबळ, नेतृत्व आणि व्यवस्थापन, संस्थेतील चांगले उपक्रम या बाबींचा विचार केला जातो. या सर्वांसाठी विद्यापीठाकडून चांगला अहवाल नॅककडे जाणे अपेक्षित असते. त्याप्रमाणे विद्यापीठाने अहवाल तयार  करण्याचे काम जवळपास पूर्ण केले आहे. हे काम संपताच विद्यापीठ हा अहवाल नॅककडे पाठवणार आहे. अहवाल
सादर केल्यानंतर नॅकची समिती विद्यापीठाला भेट देणार आहे. समितीने भेट दिल्यानंतर विद्यापीठाचा दर्जा निश्‍चित होईल, परंतु यासाठी विद्यापीठाला आणखी महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

नॅकसाठी सादर करण्यात येणारा प्रस्ताव तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. यामध्ये प्र-कुलगुरू यांनी जातीने लक्ष घातले आहे. त्यानुसार येता आठवडा ते १५ दिवसांत नॅकचा प्रस्ताव सादर होईल.
- डॉ. अजय देशमुख,
कुलसचिव, मुंबई विद्यापीठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026: भारताला मिळालं ५ वं गोल्ड! नीरु ढंडाने एकाच दिवशी दोन पदकं जिंकून रचला इतिहास

Mumbai Protest: मुंबईत मातंग समाज आक्रमक! अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणाच्या समर्थनात उग्र आंदोलन, पोलिसांचा लाठीचार्ज

Maharashtra Sugar Season 2026 : साखर कारखाने 15 ऑक्टोबरपूर्वीही सुरू करा, विरोध डावलून शासनाकडून परिपत्रक जारी; नवा संघर्ष पेटण्याची शक्यता

Marathi News Live Updates: मातंग समाजाचा मुंबईत मोर्चा; सीएसएमटी ते मंत्रालय मार्गावर रस्ता अडवण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड

Pune MLC Election: शिक्षक, पदवीधर’ची आजपासून रणधुमाळी ;दोन दिवसांत जागा वाटप; सहा ऑक्टोबर अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस

SCROLL FOR NEXT