मुंबई

अत्यंत गंभीर : मुंबईत अक्षरशः मिनिटा-मिनिटाला आढळतायत पॉझिटिव्ह रुग्ण, पायाखालची जमीन सरकावणारा रिपोर्ट

समीर सुर्वे

मुंबई, ता. 27: मुंबई महानगर पालिकेने कोविडच्या चाचण्या वाढविण्यास सुरवात केल्यापासून कोविडच्या रुग्णांची संख्या पाच हजारांवर पोहचू लागली आहे. गेल्या आठवडाभरात तासाला सरासरी 148 नव्या रुग्णांची नोंद झाली, तर रुग्ण पॉझिटीव्ह येण्याचे प्रमाणही आता 11 टक्‍क्‍यांपर्यंत पोहचले आहे.

मुंबईत कोविडची दुसरी लाट येण्याच्या टप्प्यावर आहे. मंगळवारपासून मुंबईसह राज्यभरात रात्रीची संचारबंदी लागू झाली आहे. तर, महानगर पालिकेने चाचण्याचे प्रमाण दुप्पट करण्याचा निर्णय घेत सरासरी 20 ते 25 हजार पर्यंत होणाऱ्या चाचण्याची संख्या 47 हजारांच्या पुढे नेली आहे. आतापर्यंत चाचण्या केलेल्या रुग्ण पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण दहा टक्‍क्‍यांच्या आत होते. गेल्या दोन दिवसात हा दर 11 टक्‍क्‍यांवर गेला आहे. 

आठवडाभरातील रुग्णांचा आढावा

  • 20 मार्च - 2746
  • 21 मार्च -3497
  • 22 मार्च -3027
  • 23 मार्च -3245
  • 24 मार्च - 4907
  • 25 मार्च - 5187
  • 26 मार्च - 5513

कोविडच्या चाचण्या वाढू लागल्याने रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र, मुंबई महानगरपालिकेने वाढणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षात घेऊन योग्य तयारीही केलेली आहे, असे पालिका आयुक्त इक्‍बाल सिंह चहल यांनी सांगितले.

वाढीचा दर 1 टक्‍क्‍या जवळ

साथीच्या आजारात रुग्णवाढीचा दर 1 टक्क्यांपेक्षा कमी झाल्यास साथ संपली असे वैद्यकिय क्षेत्रात मानले जाते. गेल्या आठवड्यापर्यंत मुंबईतील रुग्णवाढीचा दर 0.68 टक्के होता. गुुरुवारच्या नोंदी प्रमाणे हा दर 0.98 टक्के झाला आहे. तर, 24 पैकी 11 प्रभागात रुग्णवाढीचा दर 1 टक्‍क्‍याच्या पुढे असल्याचं आकडे सांगतात. यात एम पश्‍चिम चेंबूर येथे सर्वाधिक 1.38 टक्के आणि त्या खालोखाल एच पश्‍चिम वांद्रे, खार पश्‍चिम येथे 1.35 टक्के एवढा आहे.

महत्त्वाची बातमी : मनसुखचा मृतदेह सापडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सचिन वाझेनं काय केलं?

अत्यावस्था रुग्णांची संख्याही वाढली

20 मार्च रोजी उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या 21 हजार 335 होती. त्यात, 470 रुग्ण हे अत्यावस्था होते. 25 एप्रिल रोजी ही संख्या 527 वर पोहचली आहे. उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या 33 हजार 961 वर आली आहे. 

mumbai on the verge of second wave of corona average 148 patients detected in one hour since last week

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून बाळासाहेब लांडगे यांचं निलंबन

बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरणार? पुढच्या 6 महिन्यात 'या' 4 राशी करोडपती होणार? कोणत्या त्या राशी जाणून घ्या...

Pune Accident: बसची वाट बघत उभे होते, तेव्हाच टेम्पो काळ बनून आला अन्..., दोघांचा जागीच मृत्यू, घटनेने पुण्यात खळबळ

Dhule Crime : दारूच्या नशेत पत्नीवर प्राणघातक हल्ला, धुळे कोर्टाने सुनावली ५ वर्षांची शिक्षा

SCROLL FOR NEXT