मुंबई

मुंबई : मुद्रांक शुल्क सवलत रद्द होताच घरखरेदीही मंदावली

मुंबईत यंदा डिसेंबरपर्यंत पाच हजार ४७५ घरांचीच विक्री

सकाळ वृत्तसेवा

मुंबईत यंदा डिसेंबरपर्यंत पाच हजार ४७५ घरांचीच विक्री

मुंबई : गृहनिर्माण क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य सरकारने मुद्रांक शुल्कामध्ये सवलत दिल्याने गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात मुंबईत (MUMBAI)घरांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली होती; परंतु ही सवलत रद्द होताच घर खरेदीचा उत्साह कमी झाला असून, मुंबईत आजपर्यंत केवळ पाच हजार ४७५ घरांचीच विक्रीची नोंदवली गेली आहे. गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात १९ हजार ५८१ घरांची नोंद झाली होती. त्या तुलनेत यंदाच्या डिसेंबर महिन्यात घर खरेदीला कमी प्रतिसाद मिळाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

कोरोनाच्या(CORONA) पार्श्वभूमीवर लागू केलेल्या टाळेबंदीमुळे सर्व क्षेत्रावर विपरित परिणाम झाला. गृहनिर्माण क्षेत्रही यातून सुटले नाही. या क्षेत्राला गती देण्यासाठी राज्य सरकारने सप्टेंबर ते डिसेंबर २०२० पर्यंत मुद्रांक शुल्कात ३ टक्क्यांची सूट दिली. या कालावधीत राज्यात मोठ्या प्रमाणात घर खरेदी झाली. त्यामुळे विकसकांनी मुदत संपुष्टात येताच सवलतीला मुदतवाढ देण्याची मागणी लावून धरली. त्यामुळे राज्य सरकारने १ जानेवारी २०२१ ते ३१ मार्च २०२१पर्यंत मुद्रांक शुल्काचा ३ टक्के दर कायम ठेवला. या कालावधीतही मुंबईत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात घर खरेदी केली; परंतु ही मुदत संपताच घर खरेदीचा प्रतिसाद रोडावल्याचे समोर आले आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा डिसेंबर महिन्यात घर खरेदी मंदावली आहे. गेल्या वर्षी मुंबईत १९ हजार ५८१ घरांची नोंदणी मुद्रांक शुल्क विभागाकडे झाली होती. तर यंदा डिसेंबरमध्ये आतापर्यंत ५ हजार ४७५ घरांची विक्री झाली असल्याचे मुद्रांक व नोंदणी शुल्क विभागाच्या आकडेवारीतून समोर येत आहे. मुद्रांक शुल्काची सवलत रद्द केल्याने घर खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्याचे विकसकांकडून बोलले जात आहे.

सरकारने मुद्रांक शुल्कातील सवलत रद्द करताच घर खरेदीकडे काही प्रमाणात ग्राहकांनी पाठ फिरवल्याने दिसत आहे. सरकारने याचा विचार करून घरखरेदीला चालना देण्यासाठी मुद्रांक शुल्कात सवलत द्यायला हवी.

- आनंद गुप्ता, विकसक.

काही वर्षांपूर्वी मुद्रांक शुल्क सात टक्के होते. कोरोना काळात सरकारने मुद्रांक शुल्क दोन टक्क्यांवर आणल्याने मोठ्या प्रमाणात घर खरेदी झाली. घर खरेदीला चालना देण्यासाठी सरकारने शुल्काची रक्कम तीन टक्केच कायम ठेवावी.

- हर्षिल चोरडिया, विकसक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीची आज बैठक

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT