मुंबई : मुंबईत कोविड 19 चा कहर कायम असून बाधित रुग्णांच्या संख्येत आज ही मोठी वाढ झाल्याचे दिसते. आज तब्बल 478 नवे रुग्ण सापडल्याने मुंबईतील कोविड बाधितांचा आकडा 4232 येऊन पोहोचला आहे. तर आज 8 बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईकरांची चिंता कायम असल्याचे दिसते.
महत्वाची बातमी : घाटकोपर ग्राउंड रिपोर्ट: गजबज सरली; दहशत उरली...
आज मुंबईत 478 नवे कोविड पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने रुग्णांची संख्या 4232 झाली आहे. एकूण रुग्णांपैकी आज 181 रुग्ण आढळले असून 297 रुग्ण 20 ते 21 एप्रिल दरम्यान दाखल झाले असल्याचे सांगण्यात येते. आज झालेल्या 8 मृत्यूंपैकी 5 जणांना दीर्घकालीन आजार होते. आज एकूण 278 नवे संशयित रुग्ण सापडले असून आतापर्यंत 7606 संशयित रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
प्रतिबंधित क्षेत्रात कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी विशेष क्लिनिक सुरू करण्यात आले आहेत. या 154 विशेष क्लिनिक मध्ये 5836 लाभार्थीचे सर्वेक्षण करण्यात आले असून त्यापैकी 2195 संशयितांचे नमुने घेण्यात आले. पलिकेतर्फे आजपर्यंत 47829 पेक्षा अधिक इमारतींचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. कोविड बाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना 14 दिवस अलगीकरण कक्षात ठेवण्यात येते. आता पर्यंत 92,112 व्यक्तींना अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून त्यापैकी 18,807 व्यक्तींनी आपला 14 दिवसांचा अलगीकरणाचा कार्यकाळ पूर्ण केल्याची महिती पालिकेने दिली.
in Mumbai within 24 hours 478 New corona positive, death also rate increase
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.