मुंबई

लोकलमध्ये मोबाइल चोराला पकडण्याच्या झटापटीत तिचं आयुष्य संपलं

दीनानाथ परब

ठाणे: मोबाइल चोराला पकडताना एका महिलेचा लोकल ट्रेनखाली (Local train) येऊन दुर्देवी मृत्यू झाला. कळवा रेल्वे स्टेशनवर (Kalwa railway station) ही घटना घडली. विद्या पाटील (३५) असे मृत महिलेचे नाव आहे. प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्या गॅपममध्ये ही महिला पडली. रेल्वे पोलिसांनी आरोपी चोराला अटक केली असून त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. (Mumbai Woman run over by local train in attempt to catch mobile thief)

विद्या पाटील आपल्या अंधेरीतील कार्यालयातून घरी परतत असताना ही घटना घडली. सहा महिन्यानंतर विद्या यांचा कामावरचा हा पहिलाच दिवस होता. बाळंतपणासाठी त्यांनी रजा घेतली होती. विद्या यांच्या पश्चात पती आणि तीन मुली असा परिवार आहे.

काय घडलं?

२९ मे रोजी लोकल रात्री ७.३० च्या सुमारास कळवा रेल्वे स्थानकात पोहोचल्यानंतर आरोपीने महिलांच्या डब्ब्यात प्रवेश केला. विद्या आतमध्ये बसलेल्या असताना आरोपीने त्यांच्या हातातून मोबाइल हिसकावला व दरवाजाच्या दिशेने पळाला. विद्या त्याच्यामागे पळाल्या व चोराची कॉलर पकडली. तो प्लॅफॉर्मवर उडी मारण्याच्या तयारीत असताना विद्या यांनी त्याची कॉलर पकडली. निसटण्याच्या झटापटीत आरोपीने विद्या यांनी ढकलले व त्या प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्या गॅपमध्ये पडल्या.

चोर त्यावेळी निसटण्याचा यशस्वी ठरला. पण विद्या यांचा ट्रेन खाली येऊन मृत्यू झाला. रेल्वे पोलिसांनी आयपीसीच्या कलम ३९४ आणि ३०४ कलमातंर्गत अज्ज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंदवला व तपास सुरु केला. पोलिसांनी स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरुन आरोपीचा शोध सुरु केला. खबऱ्यांच्या मदतीने त्यांनी आरोपीची ओळख पटवली व मुंब्र्याच्या बॉम्बे कॉलनीमधुन अटक केली. फैझल जमील अहमद शेख असे आरोपीचे नाव असून सध्या तो अटकेत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election : भाजपकडून विधानसभा निवडणुकीच्या तयारीला वेग! महाराष्ट्रात भूपेंद्र यादव यांच्याकडे दिली मोठी जबाबदारी

Latest Marathi Live Updates : ग्रीड तुटल्याने दिल्ली विमानतळावरील वीज पुरवठा खंडीत

T20 Cricket : कॅच घ्यायचाच नव्हता मात्र जिवावर बेतलं अन्... टी 20 सामन्यातील या व्हिडिओची सगळीकडं चर्चा

Nashik Crime News : जादूटोणा करणाऱ्या भोंदूबाबाला अटक! मंदिर परिसरात सापडलेल्या मानवी कवट्या प्लॅस्टिकच्या

Government Employees Retirement : निवृत्तीचं वय अन् महागाई भत्ता, दोन्ही वाढणार! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी काय आश्वासन दिलं?

SCROLL FOR NEXT