मुंबई

मुंबईकरांनो आता मुसळधार पावसाची चिंता नको, 'असा' मिळणार 'Alert' 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई- सर्वजण वाट पाहत असलेला मान्सून अखेर गुरुवारी महाराष्ट्रात दाखल झाला आहे. गोवा, दक्षिण कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात मान्सूनच्या पावसाने हजेरी लावली. याचदरम्यान मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आज मुंबईकरांना आता पुराचा धोका सांगणारी यंत्रणा मिळणार आहे. दरवर्षी पावसात मुंबईकरांचे प्रचंड हाल होतात. मुसळधार पाऊस पडला की मुंबईची तुंबई होते आणि मग अनेक लोकं बरेच दिवस कुठेनाकुठे अडकून पडतात. त्यात मुंबईचं जनजीवन विस्कळीत होऊन जातं. मात्र मुंबईकरांनो चिंता करु नका, कारण ही यंत्रणेमुळे यंदाच्या पावसाळ्यात मुंबईकरांचे हाल कमी होतील हे निश्चित आहे. 

ही यंत्रणा मुंबईकरांना 12 तास आधीच पुराचा अलर्ट देईल. ही माहिती प्रभागनिहाय मिळणार असून कुठे किती पूर येऊ शकतो याची सूचना आधीच प्राप्त होईल. त्यामुळे त्याचा नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांच्या हस्ते या प्रणालीचं उदघाटन होणार आहे.

या यंत्रणेमुळे बाधित होणाऱ्या लोकांचं स्थलांतर करणं आणि त्यांना सुरक्षित स्थळी पोहोचवणं याबाबतचे निर्णय घेण्यासाठी प्रशासनाला मदत होईल. तसंच निर्णय घेण्यात देखील मदत होणार आहे. आपत्कालीन परिस्थितीची सूचना आधीच मिळाली तर रेल्वे आणि पालिकेच्या यंत्रणाही सतर्क होतील. तसंच त्यामुळे लोकांनाही याबाबतच्या सूचना आधीच प्राप्त होतील. पावसाळ्यात बरेच नागरिक अडकून बसतात आणि तुंबलेल्या पाण्यातून आपल्या घराची वाट धरतात. या दरम्यान अनेक अपघात देखील होत असतात. याच पार्श्वभूमीवर या यंत्रणेमुळे ज्या ज्या ठिकाणी पाणी साचते त्या त्या ठिकाणी आधीपासून यंत्रणा सज्ज ठेवता येईल. 

राज्यात मान्सूनचं आगमन

गुरुवारी गोवा, दक्षिण कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात मान्सूनचे आगमन झाले आहे. आगामी चार ते पाच दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात हा मान्सून पोहचेल, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवला. पुढील चार दिवस म्हणजे 14 जूनपर्यंत राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. गुरुवारी सकाळही मुंबईत पावसानं हजेरी लावली आहे. जोरदार वाऱ्यासह मुंबईत पावसानं अखेर एन्ट्री घेतली. मुंबईतल्या दादर, माटुंगा, लालबाग, परळ, अंधेरी, मालाड, कुर्ला या परिसरात जोरदार पाऊस झाला. निसर्ग चक्रीवादळानंतर पावसानं काही काळ विश्रांती घेतली. त्यानंतर गुरुवारी पुन्हा दमदार पाऊस झाला.  मुंबईसह नवी मुंबई, पनवेल भागातही पाऊस झाला.

Mumbaikars, don't worry, you will get 'Alert' of rain

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Shirsat: अंबादास दानवेंनी लावलेली आग अन् फडणवीसांनी केलेला गेम, संजय शिरसाट कसे फसले?

Latest Marathi News Updates : पुण्यात महिलेच्या सूपमध्ये सापडले झुरळ

Pratap Sarnaik: आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर बसणार कारवाईचा चाप, परिवहन मंत्र्यांचे निर्देश

मराठी नाट्य परिषदेतर्फे खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचं आयोजन; कुठे कराल अर्ज? वाचा नियम व अटी

API Duty: आता उपचार स्वस्त होणार! औषधांच्या किमतीबाबत सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, कुणाला फायदा?

SCROLL FOR NEXT