mumbai local Dussehra Esakal
मुंबई

Mumbai Local: दसऱ्यासाठी सजली मुंबईची लाइफ लाईन; नटलेल्या लोकल ट्रेनचा VIDEO तुफान व्हायरल

Viral Video: Know How festivals are celebrated in Mumbai local?

Chinmay Jagtap

Mumbai Local: मुंबई लोकल मधून नेहमीच कोणते ना कोणते व्हिडिओ व्हायरल होत असतात. ते कधी मारामारीचे असतात तर कधी भांडणाचे असतात. तर कधी ते मुंबई लोकल मधून कशाप्रकारे नागरिक जीवाचा खेळ करून चाललेत याचे असतात. मात्र मुंबई लोकल मध्ये कशाप्रकारे सण साजरे केले जातात हे जर तुम्हाला बघायचे असेल तर पुढची बातमी नक्की वाचा.

कल्याणहून सकाळी सहा वाजून तीन मिनिटांनी मुंबईकडे रवाना होणाऱ्या स्लो लोकलमध्ये आज दसरा साजरा करण्यात आला. दसऱ्यानिमित्त सगळ्यांना सुट्टी असते यामुळे एक दिवस आधीच मुंबईकरांनी दसरा साजरा केला.

दसरा साजरा करताना मुंबईकरांनी पहिले लोकल समोर नारळ फोडला. यावेळी 'आंबे माता की जय' अशा घोषणा देण्यात आल्या. याचबरोबर आत येऊन लोकलमध्ये देवीचे फोटो लावण्यात आले. तिला मनोभावे फुलं चढवली गेली.

नंतर कल्याणहून लोकल मुंबईच्या दिशेने रवाना झाली. डोंबिवलीला अजून काही लोक चढले या ठिकाणी डोंबिवली ते दिव्या दरम्यान देवीची आरती करण्यात आली' दुर्गे दुर्घट भारी' या आरतीने सर्वच प्रसन्न झाल्याचे पाहायला मिळाले.

पुढे सर्वांना प्रसाद वाटण्यात आला आणि मोठ्या उत्साहात मुंबईकरांनी लोकलमध्ये दसरा साजरा केला. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अख्या लोकलला पताका लावण्यात आल्या होत्या. अनोळखी व्यक्तीही येऊन त्या पताका लावण्यामध्ये नागरिकांची मदत करत होते. यामुळे मुंबईकरांचे एकात्मतेचे आणि एकजुटीचे दर्शन या ठिकाणी झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT