मुंबई : ऑक्सफर्ड विद्यापीठाकडून कोरोनावरील लस बनवण्यात आलीये. या लसीच्या चाचण्या जगभरात सुरु आहेत. भारतातही सिरम इन्स्टिट्यूटच्या वतीने लसीची निर्मिती करण्यात आलीये आणि भारतात त्याच्याही चाचण्या या आठवड्यात सुरु होणार आहेत. या चाचण्यांसाठी मुंबईतील दोन हॉस्पिटलची निवड करण्यात आलीये. यामध्ये मुंबईतील KEM आणि नायर रुग्णालयाचा समावेश आहे.
भारतात एकूण दहा विविध सेंटर्सवर या लसीच्या चाचण्या करण्यात येणार आहेत. एकूण १६०० स्वयंसेवकांवर या लसीची चाचणी होणार आहे. या चाचणीमध्ये ज्यांना ही लस टोचली जाईल ते सर्व स्वयंसेवक निरोगी आहेत, म्हणजेच त्यांना कोरोनाची लागण झालेली नाही. निरोगी लोकांवर या लसीवरने काही साईड इफेक्टस होतायत का हे सर्वात आधी तपासलं जाणार आहे. या लसीची चाचणी आपल्यावर करण्यात यावी असं अनेकांना वाटत असल्याने स्वयंसेवक म्हणून सहभागी होणाऱ्यांचा उत्साहव जास्त असल्याचं पाहायला मिळतंय
मोठी बातमी - डॉक्टर आणि कंपाउंडर यांच्यावरील वक्तव्यावर संजय राऊतांचं राऊतांच रोकठोक स्पष्टीकरण, म्हणालेत...
मुंबईतील परळच्या KEM हॉस्पिटलमध्ये सिरम इन्स्टिट्यूटच्या लसीची चाचणी केली जाणार असल्याची बातमी मागील आठवड्यात माध्यमांद्वारे मुंबईत परसरली आणि KEM रुग्णालयाचा फोन खणखणायला लागला. आम्हालाही स्वयंसेवक व्हायचंय आणि यासाठी काय करावं लागेल, याप्रकारची विचारपूर सुरु झाली. अनेकांनी तर KEM रुग्णालयाला ई-मेल देखील केलेत आणि या लसीच्या चाचणीमध्ये स्वयंसेवयक म्हणून सहभागी होण्याची इच्छा नोंदवलीये.
लसीच्या मानवी चाचणीसाठी सरसकट स्वयंसेवक निवडले जात नाहीत. त्यांच्या आधी आवश्यक वैद्यकीय चाचण्या केल्या जातात. त्यानंतर स्वयंसेवकाची निवड केली जाते. आधी डॉक्टर्स आणि हेल्थ वर्कर्सवर या लसींची चाचणी केली जाणार आहे.
DGCI ने पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटला देशात ऑक्सफर्ड लसींच्या चाचणीसाठी मान्यता दिली आहे. युनायटेड किंगडम, अमेरिका ब्राझील या देशांतर आता भारतात या लसींची चाचणी करण्यात येतेय. सिरम इन्स्टिट्यूट भारतात पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचण्या करणार आहे.
भारत बायोटेक या कंपनीकडूनही कोरोनावरील लस बनवण्यात येतेय. या लसीची जेंव्हा चाचणी केली गेलेली तेव्हाही नागरिकांकडून असाच उत्साह दाखवण्यात आला होता. दिल्लीतील एम्समध्ये अनेकांनी फोन करून त्याही लसीबाबत विचारणा केली होती.
mumbikar are calling kem hospital to become volunteer for testing serum institute vaccine
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.