मुंबई

'हे' शहर आज सायंकाळी 5 पासून थेट 12 जुलैपर्यंत थांबणार ! कडकडीत लॉकडाऊन पाळण्याचे आयुक्तांचे निर्देश 

सकाळवृत्तसेवा

उल्हासनगर - नव्याने पदभार स्वीकारणारे पालिका आयुक्त डॉ.राजा दयानिधी यांनी काल रात्री उशिराने लॉकडाऊन जाहीर केल्याने उल्हासनगर आज सायंकाळी 5 वाजल्या पासून ते 12 जुलै पर्यंत थांबणार आहे. डॉ. राजा दयानिधी यांनी पी-1, पी-2 या तत्वावर सम-विषम तारखेला 1 ते 30 जून पर्यंत बाजारपेठा दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र सोशल डिस्टनिंग पाळले गेले नसल्याने व अमाप गर्दी होत गेल्याने या कालावधीत तब्बल 1 हजार 366 कोरोना बाधितांची संख्या वाढल्याचा ठपका आदेशात ठेवला आहे.

नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून 12 जुलै पर्यंतच्या लॉकडाऊनच्या कालावधीत अन्नधान्य, भाजीपाला, अंडी, फळे, बेकरी, दुध, मासळी, चिकन, मटणसाठी सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत, मद्यविक्री सकाळी 9 ते सायंकाळी 5, रेस्टॉरंट-किचन सकाळी 10 ते रात्री 10 अशी होम डिलिव्हरी करिता मुभा देण्यात आली आहे. मेडिकल दुकाने 24 तास व दुध डेअरीला सकाळी 5 ते रात्री 10 व पिठाच्या गिरणीला सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा म्हणून टॅक्सी-कॅब-रिक्षा यांना दोन प्रवासी बसवता येणार आहेत. दरम्यान तोंडाला मास्क न लावता फिरणाऱ्यांकडून 1 हजार रुपये दंड वसूल करण्याचे आदेशही डॉ.राजा दयानिधी यांनी जारी केले आहेत.

"पोलिसांची लॉकडाऊनच्या नियमावलीची जनजागृती": 

12 जुलैपर्यंत घोषित करण्यात आलेल्या लॉक डाऊनच्या नियमावलीची जनजागृती करण्याचे काम उल्हासनगरातील पोलिस ठाण्यांकडून सुरू करण्यात आले आहे. कोणत्या वस्तूंची किती वाजेपर्यंत होम डिलिव्हरीची वेळ आहे, दुध डेअरी, मेडिकल, पिठाच्या गिरण्यांची सुरू राहण्याची वेळ याविषयी चौकाचौकात उभे राहून माईक द्वारे सांगण्यात येत आहे. काल रात्री उशिराने हिललाईन ठाण्याचे पोलिस निरीक्षक मोहन खंडारे यांनी मेनरोडच्या चौकात जनजागृती करण्याची सुरवात केली असून वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कदम, सुधाकर सुरडकर, रमेश भामे यांच्या हद्दीमध्ये देखील जनजागृतीस प्रारंभ झाला आहे.

municipal commissioner released late night order complete lockdown will be followed in ulhasnagar 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT