bmc 
मुंबई

Corona : महापालिकेच्या 'त्या' डोसचा परिणाम, मुंबईतील 75 टक्के नर्सिंग होम सुरू 

सकाळवृत्तसेवा

मुंबई : नर्सिंग होम, पॉलिक्लिनिक, दवाखाने सुरू न केल्यास परवाने रद्द करण्याचा इशारा मुंबई महापालिकेने दिला होता. हा ’डोस’ परिणामकारक ठरला असून, आतापर्यंत 1068 नर्सिंग होम सुरू झाली आहेत. चुकार शुश्रूषागृहे व दवाखान्यांवर साथरोग नियंत्रण कायद्याखाली कारवाई करावी व परवाने रद्द करावेत, असे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.

मुंबईत 1416 नोंदणीकृत शुश्रूषागृहांपैकी (नर्सिंग होम) 1064 आस्थापन सुरू झाल्या आहेत. त्या ठिकाणी प्रामुख्याने हृदयविकार, रक्तदाब, मधुमेह अशा दीर्घकालिन आजारांवर उपचार केले जाता. एकूण तर 99 डायलिसिस केंद्रांपैकी 89 केंद्रे सुरू झाल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली. नर्सिंग होम, दवाखाने सुरू न करणाऱ्या वैद्यकीय व्यावसायिकांवर साथरोग नियंत्रण कायद्याखाली कारवाई करावी व त्यांचे परवाने रद्द करावेत, असे आदेश महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी दिले आहेत. त्यानुसार आता कारवाई सुरू होण्याची शक्यता आहे.

कोरोना रुग्णांचा रेड झोन असलेल्या धारावीतील दवाखाने सोमवारपासून खुले करण्यात आले. खासदार राहुल शेवाळे यांनी या दवाखान्यांना आवश्यक साहित्य पुरवले आहे. रुग्णाच्या शरीराचे तापमान मोजूनच दवाखाना अथवा नर्सिंग होममध्ये प्रवेश द्यावा. कोरोनासदृश लक्षणे असलेल्या व्यक्तींना महापालिकेच्या दवाखान्यांत अथवा फीवर क्लिनिकमध्ये पाठवावे, असे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.
 

Municipal 'dose' is effective 75% nursing homes open in Mumbai

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanju Samson 0.32s Video: संजू सॅमसनचा 'हा' Video का झालाय व्हायरल? लोकेश राहुलने हाक मारली, सुरुवातीला तो पुढे निघून गेला अन्...

वृद्ध, दिव्यांग कर्मचाऱ्यांचा त्रास कमी होणार, कार्यालयांत विशेष सुविधा मिळणार; पालिकेचा महत्त्वाचा निर्णय

MLA Randhir Savarkar: शेतकऱ्यांच्या पीक कर्ज फेडीची मुदत ३० जूनपर्यंत वाढवावी: आमदार रणधीर सावरकर, अन्याय दूर करा!

Eknath Shinde: शिवसेना-भाजपमध्ये नाराजी? एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; भाजपची तक्रार करत अमित शहांना मनातील खदखद सांगणार!

Indian Army Agniveer Bharti : भारतीय लष्करात अग्निवीरांसाठी मेगा भरती; ऑनलाईन प्रक्रिया सुरु, घरबसल्या कसा अर्ज करायचा? पाहा

SCROLL FOR NEXT