baby 
मुंबई

नायर रुग्णालयाची यशस्वी कामगिरी, तब्बल 'इतक्या' कोरोनाबाधित महिलांची सुखरुप प्रसूती...

सकाळवृत्तसेवा

मुंबई : सध्या कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. मुंबईत या व्हायरसचा सर्वाधिक प्रार्दुभाव आहे. अशातच महापालिकेच्या नायर रुग्णालयात कोरोना बाधित मातांच्या सुखरुप प्रसूतीही केल्या जात आहे. एप्रिल महिन्यात 'कोव्हिड रुग्णालय' म्हणून घोषित झालेल्या नायर रुग्णालयात दिनांक 14 एप्रिल 2020 रोजी पहिल्या कोरोनाबाधित मातेची सुखरूप प्रसूती झाली होती. त्यानंतर गेल्या 2 महिन्याच्या कालावधीत नायर रुग्णालयात 302 कोविडबाधित मातांची सुखरुप प्रसूती झाली आहे. यामध्ये एका तिळ्यांसह जुळ्या बाळांचाही समावेश आहे.

कालच तान्हुल्यांच्या 'ट्यॅ-ह्यॅं'च्या मंगलस्वरांनीही त्रिशतकी टप्पा ओलांडला असून बाळांचीही संख्या आज सकाळपर्यंत 306 झाली आहे, अशी माहिती नवजात शिशु आणि बालरोग चिकित्सा विभागाच्या प्रमुख डॉ. सुषमा मलिक, प्रसूतिशास्त्र विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉ. नीरज महाजन आणि भूलशास्त्र विभागाच्या डॉक्टर चारुलता देशपांडे यांनी दिली आहे. उपलब्ध माहितीनुसार, एकाच रुग्णालयात 300 कोरोनाबाधित मातांची प्रसूती झाल्याचे हे जगातील आजपर्यंतचे एकमेव उदाहरण आहे.

मुंबई सेंट्रल परिसरात असणाऱ्या नायर रुग्णालयातील प्रसूतिशास्त्र विभाग, नवजात शिशु आणि बालरोग चिकित्सा विभाग आणि भूलशास्त्र विभागातील डॉक्टर्स, नर्स, वॉर्डबॉय यांनी 'पीपीई किट' घालून घामाच्या धारा वाहत असताना अक्षरशः 24 तास अविश्रांत मेहनत घेऊन नवजीवन फुलवण्यात अत्यंत महत्त्वाची व मोलाची भूमिका बजावली आहे. या तिन्ही विभागातील अनेक डॉक्टर्स, परिचारिका वॉर्डबॉय हे गेल्या दोन महिन्यांपासून घरी न जाता रुग्णालयात राहूनच अथकपणे काम करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: तोडगा नाहीच! मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम; शिष्टमंडळ रात्रीतून मुख्यमंत्र्यांशी बोलणार

Talegaon Station News : १०० मीटरचे काम, वाहतूक मात्र दिवसभर जाम; चाकण एमआयडीसीतील भांबोली ते चाकण रस्त्यावर वाहतूक कोंडीचा शुक्रवार

GT vs RR Qualifier 2: वैभव सूर्यवंशीचे शतक थोडक्यासाठी हुकले... पठ्ठ्याने ५ विश्वविक्रमांसह राजस्थानला सावरले, गुजरातसमोर तगडे लक्ष्य

GT vs RR Qualifier 2: वैभव सूर्यवंशीचे ३ वर्ल्ड रेकॉर्ड्स! आंद्रे रसेलच्या नावावर असेलला विक्रम उद्ध्वस्त; जगात अव्वल नंबर कामगिरी...

Kaygaon News : ‘शेतकऱ्यांना न्याय द्या, रेकॉर्ड पारदर्शक तपासा’; जिल्हाधिकारी विनय गौडा यांचे अधिकाऱ्यांना सक्त निर्देश

SCROLL FOR NEXT