Narayan Rane,Adhish Bunglow
Narayan Rane,Adhish Bunglow Team eSakal
मुंबई

राणेंच्या बंगल्यातून BMCचं पथक बाहेर; दोन तास केली पाहणी

सुधीर काकडे

नारायण राणे यांच्या जुहूमधील अधीश बंगल्यावर अनधिकृतपणे बांधकाम केल्याचा ठपका ठेवत मुंबई महानगरपालिकेने नारायण राणेंना नोटीस पाठवली होती. त्यानंतर नारायण राणेंनी आपण कोणत्याच नियमांचं उल्लंघन केलं नसल्याचं सांगितलं. त्यानंतर आता आज या प्रकरणात मनपाने पुढील कारवाईस सुरूवात केली असून, कारवाईसाठी मुंबई महानगरपालिकेंचं पथक जुहूकडे रवाना झालं आहे. (BMC Action on Narayan Rane Adhish Bunglow, Juhu)

अधीश बंगल्याची मनपाच्या पथकाने पाहणी केली, त्यावेळी नितेश राणे, निलेश राणे आणि नारायण राणे हे तिघेही उपस्थित होते.

मनपाच्या अधिकाऱ्यांनी तब्बल दोन तास राणेंच्या बंगल्याची पाहणी केली.

नारायण राणे यांच्या बंगल्यात गेलेलं BMC चं पथक आता अधीश बंगल्याच्या बाहेर पडलं आहे,

महापालिकेच्या पथकासह फोटोग्राफर्स देखील अधीश बंगल्यात गेले आहेत. अनधिकृत कामांचे पुरावे गोळा करण्याचं काम हे फोटोग्राफर करणार आहेत.

मुंबई महानगरपालिकेच्या 9 अधिकाऱ्यांचं पथक सध्या राणेंच्या अधीश बंगल्यामध्ये गेलं असून, याठिकाणी ते कागदपत्रांची पडताळणी आणि नारायण राणेंशी चर्चा करणार असल्याचं समजतंय.

घडामोडी सुरु असतानाच राणेंचं ट्विट

काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भेटीवर त्यांनी टीका केली आहे. "सारख्या पाण्याचे वेगवेगळे डबके एकत्र आले तर त्याचा समुद्र तयार होत नाही. दाक्षिणात्य लोकांच्या विरोधात शिवसेना पूर्वी एक घोषणा देत होती. हटाव लुंगी बजाव पुंगी! आता आम्ही (शिवसेना) व तेलंगणा भाऊ भाऊ काय.. अजब परिवर्तन!" असं राणेंनी म्हटलं आहे.

महानगरपालिकेचे अधिकारी अधीश बंगल्याच्या आत गेले असून, नारायण राणेंशी चर्चा करुन ते पुढील कारवाई करणार असल्याची माहिती मिळतेय.

केंद्रीय मंत्री नारायण राणे हे स्वत: देखील या बंगल्यात उपस्थित असल्याने तणाव निर्माण होण्याची शक्यता.

नारायण राणेंच्या घराबाहेर मनपाचं पथक दाखल झालं असून, पोलिसांचा मोठा बंदोबस्त त्याठिकाणी आहे.

मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी सांताक्रूझ पोलीस ठाण्यात पोहोचले असून, याठिकाणी कागदपत्रांची पुर्तता करून, पोलीस संरक्षण घेऊन ते पुढील कारवाईसाठी रवाना होणार आहे.

बंगल्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीसांचा फौजफाटा

मनपाचं पथक काही वेळात अधीश बंगल्यावर पोहोचणार.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

VIDEO: आरसीबी प्लेऑफमध्ये जाताच विरुष्काचं भन्नाट सेलिब्रेशन; व्हिडीओनं वेधलं साऱ्यांचे लक्ष

शेतीवर कर्ज घेणारा शेतकरी झाला अब्जाधीश! खात्यात आले ९९ अब्ज रूपये, रक्कम पाहून बँकेसह खातेधारकाला बसला धक्का

SCROLL FOR NEXT