EknathShinde esakal
मुंबई

Nashik Bus Accident : सप्तश्रृंगी घाटात भीषण अपघात; मृत महिलेच्या वारसाला मिळणार दहा लाख, CM शिंदेंची घोषणा

सप्तश्रृंगी गडाच्या घाटात (Saptashrungi Ghat) एसटी बस दरीत कोसळून मोठा अपघात झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

खामगाव आगाराची बस सप्तशृंगी गडावरून आज सकाळी खामगावच्या दिशेनं निघाली होती. त्यावेळी घाटातील गणपती टप्प्यावरुन बस थेट ४०० फूट दरीत कोसळली.

मुंबई : सप्तश्रृंगी गडाच्या घाटात (Saptashrungi Ghat) एसटी बस दरीत कोसळून मोठा अपघात झाला आहे. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला, तर बसमधून प्रवास करणारे 22 जण जखमी झाले आहेत.

दरम्यान, नाशिकमधील कळवण (नाशिक) इथं सप्तशृंगी गड घाटात एसटी बसच्या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या महिलेच्या वारसाला दहा लाख रुपयांची मदत एसटी महामंडळामार्फत (ST Corporation) देण्यात येणार आहे.

या अपघातातील जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सांगितले. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे (Dadaji Bhuse) घटनास्थळी दाखल झाले आहेत.

खामगाव आगाराची बस सप्तशृंगी गडावरून आज सकाळी खामगावच्या दिशेनं निघाली होती. त्यावेळी घाटातील गणपती टप्प्यावरुन बस थेट ४०० फूट दरीत कोसळली. बसमध्ये २२ प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. गडावरील स्थानिक रहिवाशी आणि शासकीय यंत्रणांकडून मदतकार्य सुरू झालं आहे.

जखमी प्रवाशांना वणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काहींना प्राथमिक उपचार करून नाशिक इथं पुढील उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे. पाच रुग्णांना नाशिक इथं हलवण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना लवकरात लवकर बरे वाटावे, अशी प्रार्थनाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT