धक्कादायक! एकाच कुटुंबातील ८ जणांना कोरोनाची लागण  
मुंबई

धक्कादायक! एकाच कुटुंबातील ८ जणांना कोरोनाची लागण

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : राज्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढत असतानाच, नवी मुंबईतील बाधित रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गुरुवारी (ता.2) समोर आलेल्या अहवालातून तब्बल 9 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. विशेष म्हणजे या 9 जणांमध्ये एकाच कुटुंबातील 8 जणांचा समावेश आहे.

नवी मुंबईतील कोरोना बाधित रुग्णांची संख्या बुधवारपर्यंत 13 इतकी होती. यात वाशीच्या मशिदीत जाणाऱ्या एका व्यक्तीचा समावेश होता. या व्यक्तीच्या घरातील सदस्यांचे नमुने तपासणीसाठी खाजगी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल गुरुवारी प्राप्त झाल्यानंतर, एकाच घरातील 8 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. तर नेरूळ सेक्‍टर 28 येथील एका सोसायटीत राहणाऱ्या युवकाला, त्याच्या मुंबईतील कार्यालयातून कोरोनाची लागण झाली होती. या तरुणापासून त्याच्या घरातील एका सदस्याला कोरोनाची लागण झाली. या सर्वांना कस्तुरबा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. 

फेरतपासणी करणार 
गुरुवारी समोर आलेल्या सर्व कोरोना बाधित 9 जणांचे अहवाल हे खाजगी प्रयोग शाळेतून आले. त्याआधी आलेले दोन जणांचे नमुने हे देखील खाजगी प्रयोगशाळेमधूनच आले होते. सरकारी प्रयोगशाळेपेक्षा खाजगी प्रयोगशाळेची विश्वासहर्यता कमी असते. त्यामुळे आवश्‍यकता भासल्यास या रुग्णांची फेरतपासणी करू, असे महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चौथ्या T20I मध्ये भारतीय संघाचा लाजीरवाणा पराभव'या'३ मोठ्या चुकांमुळे मालिका गमावली,गंभीर हतबल, एकटा कर्णधार श्रेयस करणार तरी काय?

Ashta Bhavai Festival : 1200 वर्षांची ऐतिहासिक परंपरा! सांगलीच्या आष्ट्यात आजपासून प्रसिद्ध 'भावई उत्सव'; काय आहे खास? महाराष्ट्र, कर्नाटकातील भाविकांचं आहे श्रद्धास्थान

Snake Safety in Monsoon : सापाची पिल्ले दिसायला लहान, पण जन्मापासूनच असतात विषारी; पावसाळ्यात शेतात जाताना 'या' 4 गोष्टींची घ्या काळजी, सर्पदंशानंतर नकोत घरगुती उपाय

Student End Life : गृहपाठ न केल्याने २० रुपयांचा दंड; आठवीतील विद्यार्थिनीने चिठ्ठी लिहून उचललं टोकाचं पाऊल, नोटमध्ये नेमकं काय?

दोन्ही भाऊ इंडस्ट्रीत, चांगलं कमावता, एकत्र कुटुंबात राहता मग घरखर्च कोण करतं? अधोक्षज कऱ्हाडेने सांगितलं आर्थिक गणित

SCROLL FOR NEXT