मुंबई

नवी मुंबईत रुग्ण दुपटीचा वेग तब्बल 127 दिवसांवर

सुजित गायकवाड

नवी मुंबई  : "ट्रेस, टेस्ट आणि ट्रिट' या त्रिसूत्रीच्या काटेकोर अंमलबजावणीमुळे नवी मुंबई महापालिकेला आता कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात मोठे यश मिळाले आहे. 127 दिवसांवर आलेला रुग्ण दुपटीचा दर आणि कोरोनामुक्तीच्या 91.67 टक्के प्रमाणामुळे ही बाब अधोरेखित झाली आहे. विशेष म्हणजे मृत्युदरही एमएमआर क्षेत्रात सर्वात कमी असलेली ही महापालिका ठरली आहे. 

नवी मुंबईत मार्चपासून कोरोनारुग्ण आढळले. त्यानंतर ही संख्या दिवसेंदिवस वाढत होती. जून, जुलै आणि ऑगस्टमध्ये शहरात रुग्णसंख्येने उच्चांक गाठला होता. यादरम्यान आरोग्य विभागात आमूलाग्र बदल करून रुग्णांना शोधणे, घराऐवजी संस्थात्मक विलगीकरण करणे, तपासण्यांवर भर देणे आणि तत्काळ उपचार करणे यावर महापालिका प्रशासनाने भर देण्यास सुरुवात केली. सप्टेंबर आणि ऑक्‍टोबर या दीड महिन्याच्या काळात आरोग्य विभागाने युद्धपातळीवर केलेल्या प्रयत्नांचे फलित दिसण्यास सुरुवात झाली. ऑक्‍टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण सतत वाढताना दिसत आहे. हे प्रमाण 20 दिवसांत 91.67 टक्‍क्‍यांवर पोहचले आहे.

हे वाचा : देशद्रोह प्रकरणी कंगनाला समन्स

 30 सप्टेंबरला 32 हजार 325 रुग्ण बरे होऊन घरी परतले होते. तेव्हा रुग्ण बरे होणाऱ्यांचे प्रमाणा 88.14 टक्के होते. 20 ऑक्‍टोबरला शहरातून 39 हजार 74 रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणा 91.67 टक्के झाले आहे. त्याचप्रमाणे रुग्णसंख्येची वाढही नियंत्रणात दिसत आहे. त्यामुळे 30 सप्टेंबरपर्यंत शहरात 79 दिवसांवर असलेला रुग्णदुपटीचा कालावधीही आता तब्बल 127 दिवसांवर पोहचलेला आहे. तसेच मृत्युदरातही कमालीची घट होऊन 3 टक्‍क्‍यांहून थेट 2.02 टक्के झाला आहे. 
 
नवी मुंबईतील कोरोना स्थितीवर दृष्टिक्षेप 
- 20 ऑक्‍टोबरपर्यंत रुग्ण : 42,626 
- बरे झालेले रुग्ण : 39,073 
- उपचार सुरू असलेल रुग्ण : 2,691 
- कोरोनामुळे मृत्यू : 825 
- सप्टेंबरमधील रुग्ण संख्या : 3,598 
- 20 ऑक्‍टोबरपर्यंत झालेल्या चाचण्या : 2,54,700 
- दररोज चाचण्यांची संख्या : 3,500 
- ऑक्‍टोबर महिन्याच्या 20 दिवसांत झालेल्या चाचण्या : 56,265 
- सप्टेंबर महिन्यात कोरोनाबाधितांचे प्रमाण (टक्के) 13.72. 
- ऑक्‍टोबरमधील कोरोनाबाधितांचे प्रमाण (टक्के) : 10.57 

 
ऑक्‍टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्णसंख्या घटत आहे. कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. ही आकडेवारी दिलासाजनक असली, तरी गाफील राहून चालणार नाही. सध्या "मिशन बिगीन अगेन' अंतर्गत विविध सेवा खुल्या केल्या जात आहेत. सध्या नवरात्रोत्सव सुरू असून आगामी दसरा, दिवाळी हा उत्सवांचा कालावधी आहे. त्यामुळे उत्सव साजरे करतानाही आरोग्य सुरक्षेच्या बाबींचे काटेकोर पालन करून कोरोना विषाणूला दूर ठेवणे आवश्‍यक आहे. 
- अभिजीत बांगर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: युवा जोश, उडवली मुंबईची झोप! यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी यांची दे दणादण फटकेबाजी; ११ षटकांत १५० धावा...

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

Rice Export : तणावातही भारतीय तांदळाला इराणमध्ये मागणी; युद्धजन्य परिस्थितीवर मात करत उलाढाल, ६५ लाख टन निर्यातीचा अंदाज

SCROLL FOR NEXT