मुंबई

कोरोना चाचणी गैरव्यवहार प्रकरण: चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती नियुक्त  

विक्रम गायकवाड

मुंबईः नवी मुंबई महापालिकेच्या कोरोना चाचणी केंद्राकडून कुटुंबातील एकाच व्यक्तीची कोरोना टेस्ट करुन कुटुंबातील इतर व्यक्तींची टेस्ट न करता त्यांची कोरोना टेस्ट केल्याचे दाखवून मोठया प्रमाणावर आर्थिक भ्रष्ट्राचार करण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी कोरोना चाचणी केलेल्या नागरिकांची डाटा एन्ट्री करण्यासाठी नेमलेले नोडल ऑफिसर सचिन नेमाणे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. त्याचबरोबर या प्रकरणाच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय चौकशी समिती नेमली आहे. या चौकशी समितीला लवकरात लवकर अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. 

महापालिकेच्या कोरोना चाचणी केंद्रावर कोरोना चाचणीसाठी गेलेल्या व्यक्तीच्या कुटूंबातील अन्य व्यक्ती कोरोना चाचणी केंद्रावर गेल्या नसताना तसेच त्यांनी कुठल्याही प्रकारची चाचणी केली नसताना त्यांची कोरोना चाचणी झाल्याचे आणि त्यांचे रिपोर्ट निगेटीव्ह आल्याचे महापालिकेकडून दाखविण्यात येऊन सदरचे सर्व रिपोर्ट केंद्र शासनाच्या आय.सी.एम.आर. या साईटवर दर्शविण्यात आलेत. 

ही घटना मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून देताना काही वर्षांपूर्वी मृत झालेल्या लोकांची देखील कोरोना चाचणी निगेटिव्ह दाखवण्यात आल्याची बाब समोर आणली आहे. बोगस चाचण्या करुन कोरोना टेस्टसाठी वापरले जाणारे किट न वापरता, त्या किटची रक्कम हडप करुन कोट्यवधी रुपयांचा भ्रष्ट्राचार केला जात असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. 

याप्रकरणी तक्रार प्राप्त  झाल्यानंतर महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी शिक्षण विभागाचे उपायुक्त योगेश कुडुस्कर यांच्या अध्यक्षतेखाली तीन जणांची चौकशी समिती नेमली आहे. या समितीत एक सहाय्यक आयुक्त आणि लेखा अधिकारी यांचा समावेश आहे. या समितीला महापालिकेने नागरिकांच्या आतापर्यंत केलेल्या सुमारे साडेतीन लाख ऍन्टिजेन चाचण्यांच्या डाटा एन्ट्रीची तपासणी करण्यास सांगितले असून लवकरात लवकर याबाबतचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

---------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Navi mumbai Corona test scam case A three member committee appointed to investigate

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: दुसऱ्याच षटकात गुजरातला मोठा धक्का; सिराजने बेंगळुरूला मिळवून दिली पहिली विकेट

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

Akshaya Tritiya 2024 : कुंडलीतील पितृदोष दूर करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला करा हे उपाय, घरात नांदेल सुख-शांती 

SCROLL FOR NEXT