Metro 
मुंबई

मेट्रो संदर्भात नवी मुंबईकरांसाठी एक चांगली बातमी

खारघर ते पेइंधर सेवा डिसेंबर २०२१ पर्यंत सुरू होणार

सुजित गायकवाड

नवी मुंबई: गेले अनेक वर्षे रखडलेल्या नवी मुंबई (Navi mumbai) मेट्रोची ट्रायल रन (metro trial run)घेऊन सिडकोने कोव्हीडमुळे थांबलेल्या अर्थचक्राला पुन्हा एकदा चालना देण्याचा प्रयत्न केला. सेंट्रल पार्क खारघर ते पेइंधर अशा ८५० मीटर अंतरावर मेट्रोरेल्वेची सलग दुसऱ्यांदा यशस्वी चाचणी घेण्यात आली. महामेट्रोच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ताशी ६५ प्रति किलो मीटर वेगाने चाचणी घेण्यात आली. या चाचणीनंतर डिसेंबर २०२२ पर्यंत प्रत्यक्ष मेट्रो सुरू करण्याचे प्रयत्न असल्याचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी सांगितले. (Navi mumbai metro trial run sucessfull)

सिडकोतर्फे नवी मुंबई मेट्रो प्रकल्पाच्या बेलापूर ते पेंधर या मार्ग क्रमांक १ च्या जलद अंमलबजावणीकरिता महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनची (महा मेट्रो) नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार महा मेट्रोकडून २३ फेब्रुवारी २०२१ला प्रकल्पाच्या अंमलबजावणीकरिता २० तज्ज्ञ अभियंत्यांच्या गटाची स्थापना करण्यात आली आहे. परंतु सद्यस्थितीत मार्ग क्रमांक १ वर उभारण्यात येणाऱ्या ११ स्थानकांपैकी १ ते ६ स्थानकांच्या उभारणीचे काम काही तांत्रिक कारणांमुळे तसेच कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या स्थितीमुळे अपेक्षित गतीने होत नव्हते.

या मार्गावरील उर्वरित कामे लवकरात लवकर पूर्ण करणे आणि प्रकल्पासाठी आर्थिक स्रोत निर्माण करणे, या निकषांचा विचार करून सिडकोने पर्याय शोधण्यास सुरुवात केली. यानंतर सर्वांत योग्य पर्याय म्हणून महा मेट्रोची निवड करण्यात येऊन या मार्गाचे काम महा मेट्रो यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला. महा मेट्रोच्या तज्ज्ञ गटाकरिता तळोजा मेट्रो आगार येथे कामाला सुरूवात झाली आहे. मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएआरएस) यांचे आयुक्तांकडून सुरक्षाविषयक प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर मार्ग क्रमांक १ वरील स्थानक ७ ते ११ दरम्यान साधारणत: डिसेंबर २०२१ अखेरीस आणि स्थानक १ ते ७ दरम्यान साधारणत: डिसेंबर २०२२ अखेरीस प्रवासी वाहतुकीस सुरुवात होणार आहे.

"नवी मुंबईकरांना लवकरात लवकर मेट्रोची सफर घडवण्यासाठी आमचा आटोकाट प्रयत्न सुरू आहे. त्यादृष्टीने सिडकोतर्फे महत्वाची पाऊल उचलली जात आहेत. जलद गतीने मेट्रो धावण्यासाठी आम्ही अनुभवी अशा महामेट्रोचे सहकार्य घेत आहोत."

डॉ. संजय मुखर्जी, व्यवस्थापकीय संचालक, सिडको.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT