Morning walk Google File photo
मुंबई

Navi Mumbai: मॉर्निंग वॉक, जॉगिंग करताना काळजी घ्या! अपघात टाळण्यासाठी ऐरोली जंक्शन ते घाटकोपर वाहतुकीत बदल

मॉर्निंग वॉक करताना अनेकदा लहान मोठे अपघात होण्याची शक्यता या ठिकाणी निर्माण झाला.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : सकाळी मॉर्निंग वॉक, जॉगिंग करताना लहान मोठे अपघात होत असतात. हे अपघात टाळण्यासाठी वाहतूक पोलीसांनी रस्ते वाहतुकीत बदल केला आहे. त्यानुसार, ऐरोली जंक्शन ते घाटकोपर पूर्व द्रुतगती महामार्गाच्या दक्षिण वाहिनीवरील सर्व्हिस रोड हा पहाटे ०५.०० ते ०७.३० पर्यंत वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. वाहतूक नियमनाकरीताचा हा आदेश ३१ मे २०२५ पर्यंत लागू राहणार आहे. (Navi Mumbai people be careful while morning walk jogging changes in road traffic to avoid accidents)

ऐरोली जंक्शन ते घाटकोपर, पंतनगर पर्यंत दक्षिण वाहिनीवरील सर्व्हिस रोडवर पहाटे ५ ते साडेसात दरम्यान आसपासच्या परिसरातील लोक मॉर्निंग वॉक, जॉगिंगसाठी मोठ्या संख्येने येत असतात. त्याच कालावधीत सेवा मार्गावरून वाहनांचीही वाहतूक होत असते. त्यामुळं या सेवा मार्गावर लहान मोठे अपघात होण्याची शक्यता आहे. त्यानुसार इथल्या वाहतूक नियमनाकरीता आदेश ३१ मे २०२५ पर्यंत लागू राहतील.

रस्ता वाहतुकीकरीता बंद

ऐरोली जंक्शन ते घाटकोपर, पंतनगरपर्यंत पूर्व द्रुतगती महामार्गाचे दक्षिण वाहिनीवरील सर्व्हिस रोड पहाटे ०५.०० ते ०७.३० वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतुकीकरीता बंद राहणार आहे. त्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून या कालावधीत सर्व प्रकारची वाहनं सर्व्हिस रोड ऐवजी मुख्य मार्गावरून सुरु राहिलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT