Navi Mumbai court sakal
मुंबई

Navi Mumbai: निवडणूक आयोगाविरुद्ध शिक्षक संघटना गेल्या न्यायालयात; वाचा नक्की काय आहे प्रकरण

निवडणूक आयोगाने व न्यायालयाने सवलत दिलेल्या कर्मचाऱ्यांनी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे सवलतीची मागणी केली असता त्यांच्या अडचणी समजून न घेता त्यांची मागणी फेटाळून लावली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Navi Mumbai News: विनाअनुदानित शाळांमधील, कर्करोगासारख्या दुर्धर आजाराने ग्रस्त, गरोदर व बाळाला स्तनपान करणाऱ्या माता, दिव्यांग तसेच सेवानिवृत्ती जवळ आलेल्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवडणूक आयोगाने प्रशिक्षणास गैरहजर राहिल्यामुळे कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या कृतीविरोधात महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

याबाबतच्या पत्रकात संघटनेने म्हटले आहे की, आरोग्याच्या अडचणींमुळे व इतर कारणांमुळे प्रशिक्षणास गैरहजर राहिलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवडणूक आयोगाने नोटिसा बजावल्या आहेत. निवडणूक आयोगाने व न्यायालयाने सवलत दिलेल्या कर्मचाऱ्यांनी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे सवलतीची मागणी केली असता त्यांच्या अडचणी समजून न घेता त्यांची मागणी फेटाळून लावली आहे.

याबाबत काही शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेकडे दाद मागितली असता, संघटनेने निवडणूक अधिकाऱ्यांच्या कृती विरोधात न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत.

संघटनेचे कल्याण महानगर कार्यवाह थॉमस शिनगारे हे याबाबत उच्च न्यायालयात पाठपुरावा करत आहेत. संघटनेने याचिकेद्वारा सवलतीची मागणी केलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना दिलासा मिळेल, अशी आशा याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी व्यक्त केली आहे.

प्रत्येक निवडणुकीच्या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या अडचणी समजून न घेता सरसकट आदेश बजावतात. ज्यांना शक्य होत नाही त्यांना गुन्हे नोंदवण्याच्या नोटिसा देतात.

यामुळे असहाय कर्मचारी प्रचंड तणावाखाली राहतात. दरवेळेस न्यायालयात जाणे टाळण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने एकदाच याबाबत स्पष्ट सूचना सर्व संबंधितांना द्याव्यात.

- सुधीर घागस, राज्य अध्यक्ष, शिक्षण क्रांती संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : महाराष्ट्रात आज पावसाचा जोर वाढणार; पुणे,साताऱ्यासह 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट, तुमच्या भागात कसे असेल हवामान?

Landowners Compensation Hike: जमीनमालकांसाठी नुकसानभरपाईत वाढ, ४० वर्षांनंतर उच्च न्यायालयाचा निर्णय

TB मुक्तीसाठी 'सरपंचां'ना साकडं! गावागावांत 'हँड हेल्ड एक्स-रे'द्वारे स्क्रीनिंग; लक्षणे नसलेल्या रुग्णांना शोधून मोफत उपचार

आजचे राशिभविष्य - 16 ऑगस्ट 2026

Aries Weekly Horoscope: मेष राशीसाठी मोठी खुशखबर! जुने वाद मिटणार, नवी दारे उघडणार; 'या' दिवसांत मिळेल भाग्याची साथ

SCROLL FOR NEXT